रंजना कश्यप संगीत संमेलन उद्या
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
रंजना कश्यप संगीत संमेलन उद्या
रंजना कश्यप संगीत संमेलन उद्या
रंजना कश्यप संगीत संमेलन उद्यापणजी, ता. १६ : माधुरी संगीत विद्यालय शिष्यपरिवार, दुर्गावाडी आणि इन्स्टट्यिूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पंडिता रंजनाबाई कश्यप स्मरणार्थ पहिले संगीत संमेलन आयोजित केले आहे. सं. ४ वा. होणार्या या संमेलनाचे प्रमुख अतिथीपद पं. वसंतराव काडणेकर भूषवतील. सन्माननीय अतिथीपदी मिनेझिस ब्रागांझा इन्स्टट्यिूटचे अध्यक्ष संजय हरमलकर व विशेष निमंत्रित कलाकार पुंडलिक कळंगुटकर राहतील. या संमेलनाची सुरवात साक्षी नाईक, सेजल केकर, श्रिया कैसरे, सई भांडारे, अमन भांडारे, विधी कामत, तृषा कामत, अन्वी बेने, सोहम कामत, प्राची बांदेकर, पुजा नाईक व दिपस्वी सावंत, प्रणव बांदोडकर या माधुरी सावंतांच्या कनिष्ठ शिष्यांनी गायिलेल्या स्वागत गीताने होईल. त्यानंतर शुभदा बांदोडकर, कु. प्राची अणवेकर, अमला कारापूरकर, सौ. अनिता शशीमोहन गदगकर व संगीत शिक्षिका माधुरी सावंत यांचे गायन होईल. उदयोन्मुख संवादिनी वादक प्रसाद गावस तसेच तबल्यावर गोरख मांद्रेकर, रामदास नाईक व जयेश हळदणकर साथ करतील. फोटो (एमआरडबल्यू)प्राची कमलाकांत अणवेकर अमला बांदेकर अनिता गदगकर माधुरी सावंत शुभदा बांदोडकर