शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

रामनाथ कोविंद यांचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:32 IST

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात सोमवारी ९९ टक्के मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार

- सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात सोमवारी ९९ टक्के मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. उद्या दिल्लीत सर्व राज्यांतील मतपेट्या आणल्या जातील आणि मतमोजणी २0 जुलैला होईल. त्यानंतर देशाचे १४वे राष्ट्रपती कोण असतील हे जाहीर होईल.राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी २0 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एनडीएकडे तब्बल ६३ टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपा नेत्यांनी तसा दावाच केला आहे.संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. पंतप्रधान मोदी संसद भवनात मतदानासाठी वेळेपूर्वीच उपस्थित होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुजराथ विधानसभेत अहमदाबादच्या नारणपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पण त्यांनीही संसद भवनात मतदान केले. ३१ राज्यांच्या विधान भवनांमध्येही मतदानराष्ट्रपती निवडण्यासाठी देशाच्या ३१ राज्यांच्या विधान भवनांमध्येही मतदान झाले. मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तर प्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या ६ व काँग्रेसच्या १ बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते. उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे १0 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले, गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीरा कुमारांना मतदान केल्याचे कळते. राजस्थानात तीन तास आधीच मतदान पूर्ण झाले. महाराष्ट्रात २ तर झारखंडात ४ आमदारांना तुरुंगातून मतदानासाठी आणले गेले. खासदारांसाठी हिरव्या तर आमदारांसाठी गुलाबी मतपत्रिकासंसद भवनातील केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.रामनाथ कोविंद यांचा विजय का निश्चित मानला जातोय?राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या ५0 टक्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. एनडीएकडे स्वत:ची ४८ टक्के मते आहेत. याखेरीज ६ विरोधी पक्षांसह ज्या १६ पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मतांचे प्रमाण १५ टक्के आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना किमान ६३ टक्के मते निश्चितच मिळू शकतील. कदाचित त्याहून अधिक मतेही ते मिळवू शकतील. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.