शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘दीपोत्सव’ला ‘रामनाथ गोएंका’ सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2015 03:12 IST

एक लाखाहून अधिक प्रतींच्या खपाचा विक्रम करणाऱ्या २०१४च्या लोकमत ‘दीपोत्सव’च्या शिरपेचात सोमवारी उत्कृष्ट पत्रकारितेसाठीच्या रामनाथ गोएंका पुरस्काराची मौलिक भर पडली.

नवी दिल्ली : एक लाखाहून अधिक प्रतींच्या खपाचा विक्रम करणाऱ्या २०१४च्या लोकमत ‘दीपोत्सव’च्या शिरपेचात सोमवारी उत्कृष्ट पत्रकारितेसाठीच्या रामनाथ गोएंका पुरस्काराची मौलिक भर पडली. दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’च्या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले.महानगरांपासून दूर असलेल्या, धुळीने भरलेल्या एखाद्या आदिवासी पाड्यात रस्ता आणि रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांआधी मोबाइलची रेंज पोचते, पिण्याच्या शुद्ध पाण्याआधी टीव्हीवरची गाणी पोचतात आणि वीज वाहून नेणाऱ्या खांबांआधी मोबाइल फोन चार्ज करण्यापुरत्या सौरऊर्जेच्या छत्र्या उगवतात, तेव्हा काय घडते? या एकाच प्रश्नाचा शोध घेत भारताचे चार कोपरे धुंडाळून ‘लोकमत’च्या पत्रकारांनी आणलेल्या चार कहाण्या प्रतिष्ठेच्या ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’च्या मानकरी ठरल्या आहेत. २०१४ सालच्या दिवाळीत चर्चेचा विषय झालेल्या या अनवट प्रयत्नाचा राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव झाला आहे.खपाचा विक्रम!गेल्या वर्षी एक लाख प्रतींच्या विक्रीचा विक्रमी टप्पा ओलांडणाऱ्या लोकमत दीपोत्सवच्या अंकाने यंदाच्या दिवाळीत तब्बल ५० टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवत 1.60 लाख प्रतींचा अभूतपूर्व खप नोंदवला आहे.- लोकमत वृत्तसमूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘दीपोत्सव २०१४’ या दिवाळी अंकात चार लेखकांची ‘वेट व्हाईल वी कनेक्ट’ ही विशेष शोधमालिका प्रकाशित झाली होती. रामनाथ गोएंका फाउंडेशनच्या वतीने देशभरातील मुद्रित-इलेक्ट्रॉनिक आणि आॅनलाइन माध्यमांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रयोगशील पत्रकारितेचा गौरव केला जातो. २०१४च्या पुरस्कारांमध्ये ‘अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल’ या विभागातल्या राष्ट्रीय पुरस्काराने लोकमत दीपोत्सवचा गौरव झाला आहे.