शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गोमांसबंदीवरून जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा

By admin | Updated: October 6, 2015 05:15 IST

गोमांसबंदीच्या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीर विधिमंडळाचा सोमवारी आखाडा बनला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आमदारांनी फलक दाखवत जोरदार घोषणा दिल्या.

श्रीनगर : गोमांसबंदीच्या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीर विधिमंडळाचा सोमवारी आखाडा बनला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आमदारांनी फलक दाखवत जोरदार घोषणा दिल्या. काही सदस्य बाकांवर चढले तर काहींनी हौद्यात धाव घेतली. शिवाय त्यांनी आवर घालण्यासाठी आलेल्या मार्शलांशीही दोनहात केले. या वेळी झालेल्या हाणामारीत १ आमदार आणि १ सुरक्षारक्षक जखमी झाला. सर्वोच्च न्यायालयाने गोमांसविक्रीवरील बंदीचा श्रीनगर खंडपीठाचा आदेश २ महिने स्थगित ठेवत हा मुद्दा त्रिसदस्यीय खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्याचेही राजकीय पडसाद काश्मीरमध्ये उमटले. नॅशनल कॉन्फरन्सने गोमांसबंदीचा मुद्दा विधानसभा आणि परिषदेत लावून धरला. १९३२ च्या रणबीर दंड संहितेनुसार विधिमंडळाला गोहत्येवर आणलेली बंदी हटविण्याचा अधिकार असताना पीडीपी- भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव का घेतली? असा सवाल या पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला. जोरदार गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने प्रश्नोत्तराचा स्थगित ठेवत गोमांसबंदी, पूरपीडितांचे पुनर्वसन, तसेच वैष्णोदेवी यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टर सेवेवर सेवा कर आकारण्यासारख्या मुद्यांवर चर्चेची मागणी केली. विधानसभेत गदारोळ सुरू असतानाच अध्यक्ष कविंदर गुप्ता यांनी कामकाज सुरू ठेवले. काही आमदारांनी त्यांच्या आसनासमोर धाव घेत फलक दाखवत घोषणा दिल्या. नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य गोमांसबंदीवरून नारे देत असताना सभागृहात मार्शल्सना पाचारण करण्यात आले. मार्शल्सनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत असलेल्या आमदारांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चांगलीच झटापट होऊन काँग्रेसचे बंदीपोरा येथील आमदार उस्मान अब्दुल मजीद हे जखमी झाले. एक मार्शल वेदनेने विव्हळत असता त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उचलून सभागृहाबाहेर नेले. गोंधळ वाढत असताना टेबलवर चढलेले काही आमदार एकमेकांच्या अंगावर पडल्याने स्थिती आणखीच बिघडली. (वृत्तसंस्था)गोमांस विक्रीबंदी दोन महिने स्थगितजम्मू-काश्मीरमध्ये गोमांस विक्रीवर बंदी हटविणाऱ्या श्रीनगर खंडपीठाच्या आदेशाला दोन महिने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या दोन खंडपीठांनी दिलेले परस्परविरोधी आदेश पाहता हा मुद्दा त्रिसदस्यीय खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने दिला. ८ सप्टेंबर रोजी जम्मू खंडपीठाने रणबीर दंडसंहितेनुसार (आरपीसी) गोमांस विक्रीवर बंदी आणली होती; दुसरीकडे श्रीनगर खंडपीठाने बंदी हटवत ही तरतूद रद्द करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर राज्य सरकारला नोटीस पाठविली होती.