जिल्हा न्यायालयातून जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त रॅली
By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST
नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, मानस व्यसनमुक्ती रुग्णालय व पुनर्वसन केंद्र, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, गौरी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयातून शनिवारी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली़ यावेळी पथनाट्याद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची उपस्थितांना माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले़
जिल्हा न्यायालयातून जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त रॅली
नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, मानस व्यसनमुक्ती रुग्णालय व पुनर्वसन केंद्र, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, गौरी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयातून शनिवारी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली़ यावेळी पथनाट्याद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची उपस्थितांना माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले़रॅलीचे उद्घाटन प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच़ एस़ महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले़ यानंतर कलाकारांनी पथनाट्य सादर केले़ यातून तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले़ यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, जिल्हा न्यायाधीश एऩ के .ब्रो, प्रबंधक सूर्यभान महाजन, वरिष्ठ न्यायालय व्यवस्थापक दारके उपस्थित होते़या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील दीपक गायकवाड, पाटील, किरण वाघ आदिंसह कर्मचार्यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)फ ोटो आर वर :- ०१ जून तंबाखू रॅली या नावाने़जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचे उद्घाटन करताना प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच़ एस़ महाजऩ समवेत राजेश पटारे, एऩ के .ब्रो, सूर्यभान महाजन आदि़