शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा दिली म्हणजे उपकार केले नाहीत

By admin | Updated: September 23, 2014 05:04 IST

प्रकाश जावडेकर यांना डावलून आपल्याला राज्यसभा देऊन भाजपाने सन्मान केला आहे

मुंबई : प्रकाश जावडेकर यांना डावलून आपल्याला राज्यसभा देऊन भाजपाने सन्मान केला आहे. पण लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे ४२ लोक निवडून आले त्यामध्ये रिपब्लिकन मतांचा सहभाग आह की नाही? त्यामुळे राज्यसभा देऊ भाजपाने आमच्यावर उपकार केलेले नाहीत. पुन:पुन्हा राज्यसभा दिल्याचा उल्लेख व्हायला नको, अशा शब्दांत रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी आपली नापसंती व्यक्त केली.महायुतीच्या जागावाटपात भाजपाने आडमुठी भूमिका घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केलेला १५१ व ११९ जागांचा फॉर्म्युला चुकीचा नाही. भाजपाने आता फार तणातणी करू नये. आता भाजपाने ऐकले पाहिजे अन्यथा एकदा कुणाची ताकद किती ते स्वबळावर लढवून पाहावे. शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढले तर रिपाइंने काय करावे या पर्यायाच्या शोधात आपण आहोत, असे ते म्हणाले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. भाजपाकरिता आता आपण जागा कमी करून देणार नाही. महादेव जानकर किंवा अन्य कुणाला आपल्या जागा द्यायच्या असतील तर द्याव्या, असे आठवले म्हणाले. रिपाइंला गुलामासारखे वागवू नका. शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इमानदारीत साताऱ्यात काम केले असते तर आमच्या उमेदवाराचे डिपॉझिट गेले नसते.