शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

राज्यसभेसाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग!

By admin | Updated: June 13, 2016 05:47 IST

हरियाणात शनिवारी राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, पक्षातर्फे सोमवारी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार

नवी दिल्ली : हरियाणात शनिवारी राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, पक्षातर्फे सोमवारी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. राज्यात काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार आर.के. आनंद यांना पराभव पत्करावा लागला.पक्षाचे सरचिटणीस बी.के. हरिप्रसाद यांनी सांगितले की, उद्या निवडणूक आयोगासमोर हरियाणातील दोन जागांसाठी झालेली निवडणूक रद्द करण्याची मागणी केली जाईल. निवडणुकीत माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डांसह आपल्याच लोकांनी धोका दिल्याबाबत आरोपांचे हरिप्रसाद यांनी खंडन केले. (वृत्तसंस्था)>मोठे कारस्थानहरियाणात काँग्रेसच्या १४ आमदारांची मते अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे आनंद यांचा पराभव झाला. दुसरीकडे हुड्डा यांनी यामागे फार मोठे कारस्थान असून, सत्य उघडकीस आले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. चंदीगड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मतदानासाठी ज्या पेनचा वापर झाला, त्याचीही न्यायवैद्यक चाचणी करण्याची मागणी केली आहे.ते म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या कारस्थानाची कधीही कल्पना केली नव्हती. भाजपासमर्थित उमेदवार सुभाष चंद्रा यांच्या विजयासाठी हा कट रचण्यात आला.’