शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा स्थगित

By admin | Updated: July 12, 2016 10:47 IST

काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरणामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौरा पुढे ढकलला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनी याच्या मृत्यूमुळे काश्मिरमधील हिंसाचार उफाळला असून तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या खो-यात आत्तापर्यंत २३ ठार तर २५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. काश्मीरमधील याच तणावपूर्ण वातावरणामुळे सरकारची काळजी वाढली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौरा पुढे ढकलला आहे. येत्या १७ जुलैपासून राजनाथ सिंह पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर जाणार होते, मात्र काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती पाहता हा विषय सध्या महत्वपूर्ण असल्याचे सांगत सिंह यांनी आपला दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 
दरम्यान काशमीरमधील हिंसाचार व तेथील परिस्थितीबद्दल गृहमंत्री येत्या १८ जुलैपासून सुरू होणा-या पावसाळ अधिवेशनात निवेदन करणार आहेत.
 
( काश्मीर धगधगतेच !)
 
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनीसह तीन दहशतवादी मारले गेल्याने काश्मीरमध्ये तणावाच वातावरण निर्माण झाले. संचारबंदी व फुटीरवाद्यांनी वनीच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या संपामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अमरनाथ यात्राही स्थगित करण्यात आली आहे. या हिंसाचारामुळे खोऱ्यात २३ जण ठार २५० पेक्षा जास्त जखमी झाले असून खो-यात इंटरनेट सेवाही  बंद करण्यात आली आहे. 
हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद असल्याने शेकडो अमरनाथ यात्रेकरू येथे अडकून पडले. ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’चा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला.