शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आपण सत्ताधारी आहोत, बोलताना सजग रहा- राजनाथ सिंहांनी व्ही.के.सिंहना फटकारले

By admin | Updated: October 23, 2015 12:49 IST

आपण सत्ताधारी पक्षाचे नेते आहोत हे लक्षात ठेवून कोणतेही मत मांडण्यापूर्वी सजग राहिले पाहिजे' असे सांगत राजनाथ सिंह यांनी व्ही.के. सिंगना फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - हरियाणातील दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेस ‘एखाद्या कुत्र्यावर कोणीतरी दगड मारण्याची’ उपमा देणारे केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांना गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी फटकारले. ' आपण सत्ताधारी पक्षाचे नेते आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवून कोणतेही मत व्यक्त करण्यापूर्वी सजग राहिले पाहिजे' असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. ' कोणतेही वक्तव्य करताना, कोणीही त्याचा विपर्यास करू शकणार नाही याची खबरदारीही आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
व्ही.के.सिह यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हेही उत्तर भारतीयांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत सापडले आहेत. उत्तर भारतीयांना नियमभंग करण्यात अभिमान वाटतो, ्से रिजीजू यांनी म्हटले होते.  त्या दोघांवरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत संबंधित मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्ही.के. सिंग व रिजीजू यांची कानउघडणी केली. 
' व्ही.के. सिंग व किरण रिजीजू यांनी आपल्या वक्तव्यानंबद्दल आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मात्र कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी नेत्यांनी आपण सत्ताधारी पक्षात असल्याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या बोलण्याचा कोणीही विपर्यास करू शकणार नाही याविषयी सजग राहूनच एखाद्या मुद्यावर मत व्यक्त केले पाहिजे', असे ते म्हणाले. 'आम्ही काहीच चुकीचे बोललोच नव्हतो, असे सांगून आपण आपला बचाव करू शकत नाही, प्रत्येकाने विचार मांडताना सावधानता बाळगलीच पाहिजे ' अशी सूचनाच त्यांनी सर्व वाचाळवीर नेत्यांना केली आहे. 
 
सिंग यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करा - आझम खान
दलित जळीतकांडाच्या घटनेस 'कुत्र्यावर दगड मारण्याची' उपमा देणारे मंत्री व्ही.के. सिंग यांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे. 
व्ही.के. सिंग हे मोदींच्या मार्गावरच चालत आहेत, अशी टीकाही आझम खान यांनी केली. ते ( व्ही.के.सिंग) त्यांच्या नेत्यांकडूनच (मोदी) अशी भाषा आणि संस्कृती शिकले आहेत. बादशहाने गोध्रा हत्याकांडात मारल्या गेलेल्यांची तुलना कुत्र्याच्या पिल्लाशी केली आणि आता त्यांचे मंत्री दलितांची तुलना कुत्र्याशी करत आहेत. हे मंत्री बादशहाचे विचारच पुढे नेत आहेत, यात काहीच नवीन नाही असे सांगत आझम खान यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.