शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांतचा 'कबाली' प्रदर्शनापूर्वीच लीक !

By admin | Updated: July 19, 2016 19:53 IST

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती नंतर बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९ : प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती नंतर बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. कबाली रिलीज होण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कबालीचे निर्माते चित्रपटाच्या बेकायदेशीर लिंक्स हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते. रजनीकांत आणि राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला कबाली येत्या २२ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपट लीक झाल्याने त्यांच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर बराच परिणाम होताना दिसत आहे.

जगभरात चर्चा असलेल्या कबाली चित्रपटाची कॉपी काही संकेतस्थळांवर डाउनलोडसाठी उपलब्ध असल्याचे कळते. पण हा चित्रपट अद्याप चित्रपट शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची पायरेटेड कॉपी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मद्रास हाय कोर्टात संपर्क साधला होता. १८० पेक्षाही अधिक संकेतस्थळांवरून या चित्रपटाचे बेकायदेशीर डाउनलोड थांबवण्यासाठी निर्माते एस थानु यांनी याचिकाही दाखल केली होती.