राजेश मिश्रा यांना ४५ लाखांचा दंड अपर जिल्हाधिकारी : १८८० ब्रास वाळूचे केले उत्खनन
By admin | Updated: April 9, 2016 00:17 IST
जळगाव : मौजे वैजनाथ भाग १, ता.एरंडोल येथील वाळूगट तसेच जळगाव तालुक्यातील सावखेडा, मोहाडी व नागझिरी येथील बेसुमार वाळू उत्खनन केल्याप्र्रकरणी दाखल तक्रारीनुसार अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी राजेश मिश्रा यांना ४५ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राजेश मिश्रा यांना ४५ लाखांचा दंड अपर जिल्हाधिकारी : १८८० ब्रास वाळूचे केले उत्खनन
जळगाव : मौजे वैजनाथ भाग १, ता.एरंडोल येथील वाळूगट तसेच जळगाव तालुक्यातील सावखेडा, मोहाडी व नागझिरी येथील बेसुमार वाळू उत्खनन केल्याप्र्रकरणी दाखल तक्रारीनुसार अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी राजेश मिश्रा यांना ४५ लाख ६२ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावला आहे.सन २०१४/१५ या कालावधीत वाळू गट कक्रमांक ८ मौजे वैजनाथ भाग १ चा मक्ता श्री बालाजी इलेक्ट्रीकल्स् कं.तर्फे राजेश मिश्रा यांना मंजुर करण्यात आला होता. १ सप्टेंबर २०१५ रोजी मिश्रा यांनी या वाळूगटाचा ताबा शासनाकडे सुपूर्त केला होता. त्यानंतर एरंडोल व जळगाव तहसीलदारांनी पंचनामा केला होता. मिश्रा यांनी जळगाव तालुक्यातील नागझिरी, सावखेडा, मोहाडी व खेडी खुर्द या परिसरातून अवैध वाळू उत्खनन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. एरंडोल तहसीलदार यांनी ४ सप्टेंबर २०१५ रोजी वाळू स्थळाचा ताबा घेतला. मात्र स्मॅट प्रणालीवरील एसएमएसचे अवलोकन केल्यानंतर मे.बालाजी इलेक्ट्रीकल कंपनीतर्फे राजेश मिश्रा यांनी ५ ते १४ सप्टेंबर या कालावधित १८८० ब्रास वाळूचे उत्खनन व वाहतूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २६ ऑक्टोबर २०१५ रोजी राजेश मिश्रा यांनी खुलासा सादर केला होता. मात्र तो समाधानकारक नसल्याने राजेश मिश्रा यांना ४५ लाख ६० हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.