शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राज कपूर यांची हवेली इतिहासजमा होणार?

By admin | Updated: January 18, 2016 03:36 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकार राज कपूर यांचे जन्मस्थान असलेली पाकिस्तानातील पेशावरमधील हवेली लवकरच इतिहासजमा होणार आहे.

इस्लामाबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकार राज कपूर यांचे जन्मस्थान असलेली पाकिस्तानातील पेशावरमधील हवेली लवकरच इतिहासजमा होणार आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ही हवेली वाचवण्यासाठी ठोस योजना सादर न केल्यामुळे ही ९८ वर्षे जुनी हवेली पाडण्याचे काम सुरू झाल्याची माहिती एका स्थानिक वृत्तपत्राने दिली आहे. प्रशासनाने आताच्या मालकाकडून हे घर खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. या घराचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्याची योजना होती; मात्र किमतीच्या मुद्यावरून व्यवहार फिस्कटला. गुरु वारी या हवेलीचे छप्पर पाडण्यात आले. पेशावरमधील धाकी मुनावर शहा भागात ही इमारत आहे. राज कपूर यांच्या पूर्वजांनी बांधलेली मूळ हवेली सहा मजली होती; मात्र दोन दशकांपूर्वी इमारत कमकुवत झाल्याचे कारण पुढे करून या इमारतीचे तीन मजले पाडण्यात आले. थेट हवेली पाडली तर कारवाई होऊ शकते, त्यामुळे हळूहळू ही हवेली पाडण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी हॉटेल किंवा मॉल उभारण्याची योजना आहे. १४ डिसेंबर १९२४ रोजी राज कपूर यांचा या हवेलीत जन्म झाला होता. राज कपूर यांचे बंधूशम्मी कपूर आणि शशी कपूर यांचा जन्म भारतात झाला; पण त्यांनी या हवेलीला भेट दिली होती. १९४७ साली फाळणीनंतर कपूर कुटुंब भारतात आले, त्यानंतर या हवेलीची मालकी दुसऱ्याकडे गेली. राज कपूर यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले तरी, त्यांच्या मुलांनी वेळोवेळी या हवेलीला भेट दिली होती. राज कपूर यांची मुले रणधीर कपूर आणि ऋषी कपूर १९९० मध्ये या हवेलीमध्ये आले होते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. (वृत्तसंस्था)