शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गाडीत म्युझिक वाढवून त्या नराधमाने मैत्रिणीवर केला बलात्कार

By admin | Updated: April 27, 2017 14:18 IST

नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये दुस-या वर्षाला शिकणा-या विद्यार्थिनीने मित्रावरच बलात्काराचा आरोप केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

ग्रेटर नोएडा, दि. 27 - नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये दुस-या वर्षाला शिकणा-या विद्यार्थिनीने मित्रावरच बलात्काराचा आरोप केला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मित्राने त्याच्या एसयूव्ही कारमध्ये बसवले व कार निर्जन स्थळी थांबवून आपल्यावर बलात्कार केला असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी तरुण बीटेक पदवीधर असून तो ग्रेटर नोएडाच्या मुरशादपूर येथे राहतो. 
 
बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आरोपी तरुण नोएडा युनिव्हर्सिटीमध्ये यायचा. त्यावेळी त्याची पीडित तरुणीबरोबर ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीमध्ये झाले. फेसबुक अकाऊंटवर दोघेही परस्परांच्या फ्रेंडस लिस्टमध्ये होते. पीडित तरुणी मंगळवारी दुपारी 12.30च्या सुमारास यमुना एक्सप्रेसवेवरील एनआययू गेटच्या प्रवेशव्दारावर बसची वाट पाहत उभी होती. 
 
त्यावेळी आरोपी त्याची एसयूव्ही कार घेऊन तिथे आला. त्याने तरुणीला बसस्टॉपवर सोडतो असे सांगितले. तरुणी जिथे उभी होती तिथून बसस्टॉप एक किलोमीटरच्या अंतरावर होता. आरोपीला ओळखत असल्याने तरुणी त्याच्या गाडीमध्ये बसली. पण त्याने गाडी बस स्टॉपऐवजी फॉर्म्युला वन रेस ट्रॅकच्या निर्जन परिसरात थांबवली. त्याने तरुणीला त्याच्यासोबत मागच्या सीटवर येऊन बसण्यास सांगितले.  गाडीच्या स्टेअरिंग व्हीलवर आरोपीचा मित्र बसला होता असे तरुणीने सांगितले. या तरुणीने आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला तिने 100 नंबरवर डायल केला. पण आरोपीने तिच्या हातातून मोबाईल खेचून घेतला. 
 
निर्जन ठिकाणी गाडी थांबवल्यानंतर त्याने मित्राला गाडीतून बाहेर जाण्यास सांगितले. आरोपीने गाडीच्या सर्व काचा आणि दरवाजे बंद करुन म्युझिकचा आवाज वाढवला आणि माझ्यावर बलात्कार केला असे पीडीत तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. बलात्कारानंतर त्याने तरुणीला बसस्टॉपजवळ नेऊन सोडले व तिथून निघून गेला.