शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

2 लाख स्क्रीन्समधून रेल्वे कमावणार 10,000 कोटी

By admin | Updated: April 24, 2017 13:00 IST

भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकताना पाहायला मिळत आहे. रेल्वेचं उत्पन्न वाढावं यासाठी रेल्वे मंत्रालय कायम प्रयत्नशील असतं.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकताना पाहायला मिळत आहे. रेल्वेचं उत्पन्न वाढावं यासाठी रेल्वे मंत्रालय कायम प्रयत्नशील असतं. थेट परकीय गुंतवणूक मिळावी यासाठीही रेल्वेनं कवाडं खुली केली आहेत. आता देशभरातील रेल्वे स्टेशनांवर 2 लाख स्क्रीन लावण्याचा रेल्वेचा मानस आहे. स्टेशनांवरून लावलेल्या स्क्रीनवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून 10 वर्षांसाठी 10 हजार कोटी उत्पन्न मिळवण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनांना लवकरच डिजिटल स्क्रीन प्राप्त होणार आहे. या माध्यमातून प्रवाशाला ट्रेनची वास्तविक वेळ आणि राष्ट्रीय ट्रान्सपोर्टसंदर्भात जाहिरातींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. रेल्वे प्रदर्शन नेटवर्क (RDN)कडे यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टचा गुगल हिस्सा होण्यासाठी उत्सुक आहे. तसेच गुगलनं यासाठी जाहिराती तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करण्याची तयारी दर्शवली आहे. मायकोसॉफ्ट आणि रिलायन्सलाही या प्रोजेक्टचा भाग होण्याची आकांक्षा असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजलं आहे. यामुळे दूरदर्शनपेक्षाही सर्वात मोठा जाहिरात मंच निर्माण होण्याचं अपेक्षित असल्याचं एका रेल्वे अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे. रेल्वे प्रदर्शन नेटवर्क (RDN)च्या माध्यमातून सुरुवातील 400 रेल्वे स्टेशनांवर या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच यासंदर्भातील टेंडर मेमध्ये निघण्याची शक्यता आहे. मोठ्या आणि छोट्या डिजिटल स्क्रीन या जुनी दिल्ली, गोरखपूर, ग्वालियार आणि वाराणसी संकल्पना पुरावा (PoC) करारावर आधीच बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास 2175 रेल्वे स्टेशनांवर या स्क्रीन बसवण्याचा रेल्वेचा उद्देश आहे