शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा स्पेनच्या टॅल्गो कंपनीशी फेब्रुवारीअखेर करार?

By admin | Updated: January 21, 2017 05:17 IST

टॅल्गो ट्रेन नफ्याच्या भागीदारीच्या भाडेतत्त्वावर भारताच्या प्रमुख रेल्वेमार्गांवर धावण्याची शक्यता नव्या फॉर्म्युल्यामुळे पुन्हा दृष्टिपथात आली आहे

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- ताशी २00 कि.मी. वेगाने धावणारी स्पेनची बहुचर्चित टॅल्गो ट्रेन नफ्याच्या भागीदारीच्या भाडेतत्त्वावर भारताच्या प्रमुख रेल्वेमार्गांवर धावण्याची शक्यता नव्या फॉर्म्युल्यामुळे पुन्हा दृष्टिपथात आली आहे. अपेक्षेनुसार फेब्रुवारीअखेरपर्यंत रेल्वे मंत्रालय व टॅल्गो कंपनी यांच्यात तसा करार होईल आणि मार्चपर्यंत शताब्दीच्या मार्गांवर टॅल्गो ट्रेन धावू लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.गेल्या वर्षी प्रवाशांची सुरक्षा व प्रवासासाठीचा वेळ यांच्या साऱ्या चाचण्या टॅल्गोने पूर्ण केल्या होत्या. रेल्वेच्या पायाभूत सोयींमधे बदल न करता स्पेनहून भारतात आलेली टॅल्गो ट्रेन मोरादाबाद ते मथुरा ताशी ८0 ते ११५ कि.मी. वेगाने व मथुरा-पलवल मार्गावर ताशी १६0 ते २00 कि.मी. वेगाने धावली होती. या चाचण्यांसाठी रेल्वेला कोणताही खर्च करावा लागला नव्हता. परीक्षण यशस्वी झाल्यानंतर टॅल्गो ट्रेन रुळांवर उतरवण्याऐवजी रेल्वेने कंपनीशी करार करण्याबाबत अचानक काही कारणांमुळे हात आखडते घेतले.प्रचंड वेगात तीव्र वळणांवर रेल्वे कोच वाकण्याचे (टिल्टेड) तंत्रज्ञान जगात फक्त टॅल्गाकडे आहे. या तंत्रज्ञानामुळे तीव्र वळणांवरही टॅल्गो ट्रेनला वेग कमी करावा लागत नाही व रुळांवरून ट्रेन घसरण्याची भीतीही नसते. पण टॅल्गोच्या कोचेसचे फ्लोअर्स भारतीय रेल्वे कोचेसच्या तुलनेत थोडे खाली असल्याने प्लॅटफॉर्म व कोच यात अंतर पडते.