शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या प्रवासी गाड्यांना 'कॉर्पोरेट'चे इंजिन

By admin | Updated: June 12, 2015 16:50 IST

रेल्वे गाड्याही खासगी कंपन्यांना चालवायला द्यावात अशी शिफारस मोदी सरकारने नेमलेल्या देवरॉय समितीने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - रेल्वेतील मालवाहतुकीत खासगी कंपन्यांचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आता प्रवासी रेल्वे गाड्याही खासगी कंपन्यांना चालवायला द्यावात अशी शिफारस मोदी सरकारने नेमलेल्या देवरॉय समितीने केला आहे. 
मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी रेल्वेतील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजना यासंदर्भात निती आयोगाचे सदस्य विवेक देवरॉय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. देवरॉय समितीचा अहवाल शुक्रवारी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असून या अहवालात रेल्वेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एक्सप्रेस गाड्या खासगी कंपन्यांना चालवायला द्यायला पाहिजे, याच कंपन्या त्या गाडीची देखभाल दुरुस्तीही करतील अशी महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे.याशिवाय रेल्वे डबे, इंजिनच्या निर्मितीमध्ये खासगी कंपन्यांचा समावेश करावा असे मत देवरॉय समितीने मांडले आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची गरज नसून ही पद्धत बंद करावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून वारंवार केली जात होती. देवरॉय समितीनेही याची दखल घेत रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. रेल्वे कामगार संघटनांनी यापूर्वीच रेल्वेतील खासगीकारणाला कडाड़ून विरोध दर्शवला असून देवरॉय समितीच्या या शिफारसी मोदी सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  देवरॉय समितीच्या शिफारशींवर महिनाभरात अंतिम निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
रेल्वेतर्फे देशभरात अनेक ठिकाणी शाळा, हॉस्पिटल्स चालवले जातात. या तोट्याच्या सेवांमधून रेल्वेने बाहेर पडावे, रेल्वेतील विविध विभागांमधील खात्यांमधील एकसूत्रता आणावी अशा शिफारशीही समितीच्या अहवालात करण्यात आल्या आहेत.