शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मटका अड्ड्यांवर छापे

By admin | Updated: October 22, 2015 01:24 IST

गोव्यात राजरोसपणे चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात हायकोर्टाच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविल्यानंतर बुधवारी गुन्हा अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम उघडली. पणजीत

पणजी : गोव्यात राजरोसपणे चालणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात हायकोर्टाच्या आदेशानुसार गुन्हे नोंदविल्यानंतर बुधवारी गुन्हा अन्वेषण विभागाने जोरदार मोहीम उघडली. पणजीत दहा मटका अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांत तीन जणांना अटक करण्यात आली. मटक्याचे आकडे छापल्याबद्दल तरुण भारत व पुढारी या वृत्तपत्रांसह ११ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर मटक्याविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. पणजीतील छाप्यांत पाच हजार रुपये जप्त करण्यात आले, अशी माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली. निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. छापासत्र चालूच राहणार असून राज्याच्या इतर भागांतही छापे टाकण्यात येणार आहेत.माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये (रा. रायबंदर-गोवा) यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एप्रिल २०१५ मध्ये मटक्यांच्या अड्ड्यांविरोधात एक जनहित याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)‘पुढारी’ला सुधारित नोटीसमटक्याचे आकडे प्रसिद्ध केल्याप्रकरणी पुढारीच्या गोवा आवृत्तीला क्राईम ब्रँचकडून बुधवारी निवासी संपादकांच्या नावे सुधारित नोटीस बजावण्यात आली. किती काळापर्यंत मटक्याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले, त्यातून किती व कशाप्रकारे फायदा मिळत होता. कोणाकडून प्रसिद्धीसाठी आकडे मिळत होते, यासह इतर सविस्तर माहिती नोटिशीद्वारे मागविण्यात आली आहे. पत्रकारांचेही हात काळे!काशिनाथ शेट्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘मटक्याचा हप्ता केवळ पोलिसांनाच नव्हे, तर काही पत्रकारांनाही जातो. त्यामुळे प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी मी क्राईम ब्रँचकडे केली आहे.’