शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

राहुल यांची मोदी, ममतांवर टीका

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता

नियामतपूर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता गिरवीत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.डाव्या आघाडीच्या नेत्यांसोबत आयोजित एका संयुक्त सभेत ते बोलत होते. मोदी यांच्यावर लक्ष्य साधताना ते म्हणाले, पंतप्रधान या देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसची सरकारे मनमानीपणे पदच्युत केली. देशात केवळ एकच नेता असावा आणि तो ते स्वत: असावेत अशी मोदींची इच्छा आहे. एवढेच नाहीतर येथील जनतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी थोपविण्याची मोहीमच राबविली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. मी संसदेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो तेव्हा त्या (ममता बॅनर्जी) जे सांगतात तेच होते. इतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जात नाही, असे या नेत्यांचे म्हणणे असते. हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीत सुद्धा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (वृत्तसंस्था)अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी, जखमींना भेटले कोलकाता : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी केली. पीडितांचे सांत्वन करण्यासाठी मी येथे आलो असून, या मुद्यावर राजकारणाची आपली अजिबात इच्छा नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी झालेल्या या उड्डाणपूल अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे.राहुल गांधी यांनी कोलकाता मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात जाऊन अपघातातील जखमींचीही विचारपूस केली. उड्डाणपुलाच्या बांधकामातील त्रुटींकडे लक्ष वेधले असता मी येथे जखमींच्या भेटीसाठी आलो असून, राजकारणावर बोलणार नाही, असे काँग्रेस उपाध्यक्षांनी स्पष्ट केले. भाजपने साधले शरसंधानउड्डाण पूल दुर्घटनेनंतर राजधानी दिल्लीत व प. बंगालमधे आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर पकडला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी घटनास्थळी गेले. भाजपने मात्र या घटनेवर थेट शरसंधान करीत म्हंटले की छायाचित्राव्दारे स्वत:ची प्रसिध्दी घडवण्याची आणखी एक संधी राहुल गांधींनी साधली.