शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

‘नायक’ ठरले राहुल!

By admin | Updated: April 20, 2015 23:55 IST

लोकसभेच्या आजच्या दिवसाचे ‘नायक’ ठरले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी! अख्खा दिवस त्यांच्या भोवती फिरत होता. सभागृहातील त्यांचा वावर मोठा आक्रमक

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीलोकसभेच्या आजच्या दिवसाचे ‘नायक’ ठरले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी! अख्खा दिवस त्यांच्या भोवती फिरत होता. सभागृहातील त्यांचा वावर मोठा आक्रमक; पण अदबशीर होता. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी काँग्रेसचेच सदस्य नव्हे, तर अन्य पक्षाच्या सदस्यांची लगबग सुरू होती. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्यांचा आजचा पहिला दिवस होता. अकराच्या ठोेक्याला कामकाज सुरू झाले तशी त्यांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली. पण ते आलेच नाहीत..! राज्यमंत्री गिरिराजसिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांविषयी सभागृहात खडाजंगी चर्चा त्यावेळी सुरू होती. विरोधी पक्ष सरकारविरोधी नारे देत हौद्यात उतरला...नाऱ्यांनी सभागृह दणाणून गेले...आणि त्याच गरमागरम वातावरणात राहुल अत्यंत आक्रमक; पण हसतमुख चेहऱ्याने सभागृहात आले तेव्हा ११ वाजून २५ मिनिटे झाली होती. ते आले, विरोधी पक्ष जिथे बसतो त्या संपूर्ण आसनांमागून त्यांनी फेरी मारली. पाचव्या ओळीतील नेहमीचे आसन असलेल्या जागेवर न बसता ते दुसऱ्या ओळीत तिसऱ्या स्थानाकडे आले, त्यांनी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना वाकून अभिवादन केले, त्यांनीही अत्यंत हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले...व ते आसनावर स्थानापन्न होताच, गोंधळ वाढल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब झाले. त्यानंतर मात्र राहुल यांच्या दिशेने काँग्रेस खासदार आले. अनेकांवर त्यांनी नजर टाकली. मागच्या ओळीत बसलेले अशोक चव्हाण यांच्याशी हस्तांदोलन केले. राजीव सातव यांच्या खांद्यावर हात ठेवला. सुप्रिया सुळे यांना हॅलो म्हटले. तेवढ्यातच ज्योतिरादित्य शिंदे तिथे आले तेव्हा राहुल यांनी त्यांच्या पोटात हलकासा बुक्का मारला, तेव्हा ज्योतिरादित्यांनीही त्यांच्या खांद्यावर तसेच केले. दोघांचीही गळाभेट झाली. ज्योतिरादित्य, राहुल, त्यांच्या बाजूला तारिक अन्वर, कमलनाथ व शेवटी मेहबुबा मुफ्ती एकाच ओळीत बाकावरील आसनांवर बसले. समोरच्या बाकांवर सोनिया गांधी, त्यांच्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे होते. सोनियांनी राहुल यांना काही कागद दिले. त्यावर मोदी यांची छबी होती. तो मजकूर मंत्री व सत्ताधारी खासदार कशा पद्धतीने बेताल बोलले तो होता. त्यावर नजर खिळली असतानाच त्यांच्या मोबाईलवर एक मेल आला. त्याला उत्तर देण्यात ते गर्क झाले. सोनियांना त्यांनी तो मेल दाखविला. त्यांनी मान हलवून गुड म्हटले. तेवढ्यातच त्यांनी मोबाईल स्क्रीन सेव्हरवरील एक चित्र सोनियांना दाखविले. ते बघून त्यांची मुद्रा कुतूहलमिश्रित झाली. त्या एकदम हसल्याही. करड्या पांढऱ्या रंगाच्या चेहऱ्याचे कुत्र्याचे पिल्लू असलेले चित्र होते ते! त्यांनी मग त्याची दोन चित्रे दाखविली.