शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरोधात राहुल गांधींनी डोंगर पोखरुन काढला उंदीर

By admin | Updated: December 21, 2016 21:56 IST

सहाराच्या डायरीमध्ये तशी नोंद आहे. ही सर्व कागदपत्रे आयकर खात्याकडे असून त्याची चौकशी का झाली नाही ? या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे असे आयकर खात्याचे मत आहे असा आरोप राहुल गांधी

ऑनलाइन लोकमत मेहसाणा, दि. 21 - सहा महिन्यात नऊ वेळा सहारा समूहाने नरेंद्र मोदींना पैसा दिला. सहाराच्या डायरीमध्ये तशी नोंद आहे. ही सर्व कागदपत्रे आयकर खात्याकडे असून त्याची चौकशी का झाली नाही ? या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे असे आयकर खात्याचे मत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी गुजरातच्या मेहसाणामध्ये जाहीर सभेमध्ये बोलताना केला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी नरेंद्र मोदीं विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

हे तर जुनंच प्रकरण....2012-13 मध्ये आयकर खात्याने टाकलेल्या धाडीमध्ये आदित्य बिर्ला समूहातील अधिका-यांच्या डाय-या, लॅपटॉप आदी जप्त करण्यात आले होते. यामध्ये गुजरात मुख्यमंत्री या नावाने 25 कोटी रुपयांची नोंद आढळली होती. याचा आधार घेत अरविंद केजरीवाल व प्रशांत भूषण यांनी मोदींविरोधात झोड उठवली होती. तसेच सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा पुरेसा पुरावा नसल्याचे सांगत कारवाईस नकार दिला होता.

राहुल गांधींनी मोदींविरोधात वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि सज्जड पुरावे असल्याचा दावा केला होता. मात्र आजच्या गुजरातमधल्या सभेत राहुल गांधींनी हे जुनेच प्रकरण उकरल्यामुळे डोंगर पोखरुन उंदीर काढल्याची भावना व्यक्त होत आहे. नऊवेळा प्रत्येकी पाच कोटी रुपये असे एकूण मिळून 45 कोटी रुपये मोदींना दिल्याचा सहाराच्या डाय-यांमध्ये उल्लेख आहे.