शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातून राहुल गांधी परतले

By admin | Updated: January 11, 2017 01:11 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशातून सोमवारी रात्री भारतात परतले असून, मंगळवारी सकाळी राहुलची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशातून सोमवारी रात्री भारतात परतले असून, मंगळवारी सकाळी राहुलची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या निवासस्थानी गेल्या. कॅप्टन अमरिंदरसिंगही यावेळी त्यांना भेटावयास गेले होते. पाठोपाठ काँग्रेस नेत्यांची वर्दळही तिथे सुरू झाली.राहुल गांधींच्या अनुपस्थितीत देशात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. नोटाबंदी निर्णयाचे ५0 दिवस पूर्ण झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. उत्तर प्रदेशात काँग्रेस या काळात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव गटाशी आघाडी करण्याचे मनसुबे रचत असल्याच्या चर्चेला उधाण आले. पंजाबमध्ये काँग्रेसतर्फे नवज्योतसिंग सिद्धू निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले. सिद्धू दिल्लीत असून त्यांनाही राहुलच्या आगमनाची प्रतिक्षा होती. राहुल यांच्या अनुपस्थितीत विरोधकांच्या नोटाबंदीविरोधी आघाडीचे ममता बॅनर्जींनी नेतृत्व केले. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागून देशात राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी केली. सोनिया गांधीच्या भेटीनंतर राहुल गांधींनी पाच राज्यांच्या निवडणूक रणनीतीशी संबंधित बैठकांना सुरुवात केली. पंजाब त्यात अग्रक्रमावर आहे. राहुलना सिद्धूही भेटणार आहेत. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पंजाब, उत्तराखंड व गोवा येथील प्रदेश निवडणूक समितीच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांना राहुल स्वत: उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचाही तळ मंगळवारी दिल्लीतच आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश गटाबरोबर काँग्रेसच्या समझोत्याविषयी अधिकृतपणे कोणीही भाष्य केले नसले तरी राहुल गांधी आणि अखिलेश यादवांची भेट होऊ शकते.