शेतातील उभी पिके पेटविली भांडणाचा राग : दोघांविरूध्द गुन्हा
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
संगमनेर : मागील भांडणाचा राग मनात धरून शेतातील ज्वारी व बाजरी पिके पेटविल्या प्रकरणी तालुका पोलिसात दोघा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
शेतातील उभी पिके पेटविली भांडणाचा राग : दोघांविरूध्द गुन्हा
संगमनेर : मागील भांडणाचा राग मनात धरून शेतातील ज्वारी व बाजरी पिके पेटविल्या प्रकरणी तालुका पोलिसात दोघा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांची माहिती अशी, पिंपरणे गावातील शेतकरी संतोष रघुनाथ वर्पे यांचे दोन वर्षांपूर्वी विहीर खोदण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. दरम्यान मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी सुधाकर विश्वनाथ पांडे व भैय्या उर्फ प्रवीण बबन पांडे यांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वर्पे यांच्या गट नंबर ११८ मधील ज्वारी व बाजरीची उभी पिके पेटवून दिली. याप्रकरणी वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी वरील दोघा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पद्मनाथ खरात व राजू खेडकर करीत आहेत. (प्रतिनिधी)