शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

रघुवर दास यांचे सत्तारोहण

By admin | Updated: December 29, 2014 04:13 IST

भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली़ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी

रांची : भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली़ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे खराब हवामानामुळे दास यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत़ दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, अनेक व्हीआयपी या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाहीत़येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर दास यांचा शपथविधी सोहळा पार पडला़ त्यांच्यासोबत नीलकंठ सिंग मुंडा, चंद्रशेखर प्रसाद सिंग, लुईस मरांडी (सर्व भाजपा)आणि चंद्रप्रकाश चौधरी (आॅल झारखंड स्टुडंट युनियन) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली़ मोदी आणि अमित शहा यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, रामविलास पासवान, उपेंद्र कुशवाहा, जयंत सिन्हा, सुदर्शन भगत आदी उपस्थित होते़ आदिवासीबहुल झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणारे दास हे पहिले बिगर आदिवासी नेते आहेत़ रघुवर दास यांनी यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-आजसू युतीने ८१ पैकी ४२ जागांवर विजय संपादित करून बहुमत प्राप्त केले आहे. दास हे झारखंडचे दहावे मुख्यमंत्री आहेत़ बाबूलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा यांच्यानंतर ते झारखंडमध्ये भाजपाचे तिसरे मुख्यमंत्री ठरले़ (वृत्तसंस्था)