शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वैदर्भीय औदार्याने जिंकली पंजाबी मने!

By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST

घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते

राजेश पुनूरकर, (संत नामदेव नगरी) -घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंजाब सरकारकडून दिलेल्या मदतीमुळे पंजाबी औदार्याची चर्चा होत असताना शिख धर्मीयांसाठी दोन महत्वाचे रस्ते आणि पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन घेण्यासाठी पुढच्या वर्षी नागपूरचे आमंत्रण देऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वैदर्भीय औदार्याचेही उदाहरण घालून दिले. संमेलनाच्या उद्घाटन समारंभात शिख धर्मीयांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा अमृतस-घुमान- हरगोबींदपूर- तांडा या रस्त्याची घोषणा गडकरी यांनी केली. महत्वाची तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या या चार पदरी सिमेंटच्या रस्त्यासाठी तब्बल १८०० कोटी रुपयांचा निधी जाणारआहे. त्याचबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी नांदेडसाहेब ते आनंदपूरसाहेब या रस्त्याची मागणी केली. व्यासपीठावरूनच गडकरी यांनी त्याला मंजूरी असल्याचे सांगितले. यावर बादल म्हणाले, ‘‘ गडकरी यांनीआजपर्यंत पंजाबला कधीही विन्मुख केले नाही.’’बादल यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्याचे संमेलन ज्या पध्दतीने पंजाबध्ये झाले तसे पंजाबी साहित्याचे संमेलन महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे भाषण संपल्यावर गडकरी यांनी व्यासपीठावरून पुन्हा एकदा पुढील वर्षीच पंजाब साहित्य अकादमीचे संमेलन नागपूर येथे घेण्यासाठी आमंत्रण दिले. टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक करण्यात आले. गडकरी यांनी आपल्या भाषणात पंजाब आणि महाराष्ट्राचे अनुबंध उलगडले. ते म्हणाले, ‘‘ संत नामदेव केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते राष्ट्रीय संत आहेत. घुमानमध्ये गुरुद्वारा आणि मंदिर एकत्रित पाहून आनंद आणि समाधान वाटले. पंजाबने देशासाठी केलेले बलिदान हा देश विसरु शकत नाही. संत नामदेवांवर मराठी लोक प्रेम करतात आणि तितकेच प्रेम पंजाबी लोकही करतात. पंजाब आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध कायम आहेत आणि भविष्यातही ते कायम राहतील. पंजाब आणि महाराष्ट्र यांची परंपरा, संस्कृती आणि इतिहास सारखा आहे. साहित्याबद्दल मराठी माणसाला जेवढे प्रेम आहे तेवढेच पंजाबी माणसालाही आहे. आज घुमान या गावी होणारा हा साहित्य संगम देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. केवळ भौतिक सुखाने काही लाभत नाही. संस्कारांची पेरणी समाजात कराी लागते. ते काम संत साहित्य करते. त्यामुळे जीवनाला दिशा मिळते. आम्ही त्याच विचाराने कार्य करतो.