आरोप सिद्ध करून दाखवा; राजकारणातून निवृत्त होईल घरकूल प्रकरण : रमेशदादा जैन यांचे एकनाथराव खडसेंना आव्हान
By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST
जळगाव- खान्देश विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील करार आणि राष्ट्रवादी पक्षाला दिलेला निधी हे दोन्ही आरोप एकनाथराव खडसे यांनी सिद्ध करून दाखवावे, सिद्ध करून दाखविल्यास राजकारणातून कायमस्वरूपी निवृत्त होईल व त्यांची माफी मागेल मात्र आरोप सिद्ध करू न शकल्यास खडसे यांनी जनता, प्रशासन व न्यायालयाची जाहीर माफी मागावी, असे जोरदार आव्हान खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी खडसे यांना आज दिले.
आरोप सिद्ध करून दाखवा; राजकारणातून निवृत्त होईल घरकूल प्रकरण : रमेशदादा जैन यांचे एकनाथराव खडसेंना आव्हान
निवडणूक बंदोबस्त : राहण्याचे अन् खाण्याचेही वांधेनाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत असून, ते सुरक्षित वातावरणात व्हावे यासाठी परजिल्ातील गृहरक्षक दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांची ज्या पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनीच या जवानांना वार्यावर सोडले असून, त्यांचे खाण्या-पिण्याचे वांधे झाले आहेत. महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील मतदान उद्या होत असून, ते शांततेत व सुरक्षित वातावरण पार पडावे यासाठी ज्या जिल्ांमध्ये मतदान आहे त्याठिकाणी परजिल्ातील गृहरक्षक दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. नाशिक लोकसभेसाठीही उद्या मतदान होत असून, सुरक्षेच्या हेतूने नांदेड जिल्ातील सुमारे ३५० होमगार्ड्स निवडणूक बंदोबस्तासाठी सोमवारीच शहरात दाखल झाले आहेत. सायंकाळी त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बंदोबस्ताची नियुक्ती मिळाली. परजिल्ातून आलेल्या या होमगार्डच्या जवानांची राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे पोलीस यंत्रणा वा जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे असताना तशी कोणतीही व्यवस्था या जवानांची करण्यात आलेली नाही. गंगापूररोड, भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या होमगार्डच्या जवानांना राहण्यासाठी बराकी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सरकारवाडा, सातपूर पोलीस ठाण्याकडून कोणतीही सोय या जवानांची करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जवानांना स्वत:च्या खर्चाने खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागली आहे, तर राहण्यासाठी आडोसा शोधावा लागला आहे. काही पोलीस ठाण्यांकडून होमगार्डच्या जवानांना केवळ तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले; पण ते शिजवायचे कुठे, असाही प्रश्न या जवानांसमोर होता. दरम्यान, ज्या जवानांची पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेली नाही ते पोलिसांच्या राखीव पथकासमवेत असून, त्यांचीही कोणतीही व्यवस्था नाही. या जवानांना सोमवारची रात्र सीबीएस, मेळा बसस्थानकावर काढावी लागली. होमगार्ड्सच्या जवानांनी सकाळी चहा-बिस्किटांचा नाश्ता केला, तर दुपारीही हॉटेलमध्ये स्वखर्चाने जेवण करावे लागले. सार्या बाबींचे वांधे झाल्याने होमगार्ड जवानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फोटो : २३पीएचएपी९७बसच्या आडोशाला विश्रांती घेताना होमगार्ड्स.२३पीएचएपी१०८सार्वजनिक पाणपोईवर पाणी पिताना होमगार्ड.२३पीएचएपी१६९ ते १७१बिस्किटांचा नाश्ता करताना होमगार्ड.