शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया कुमारवरील शिस्तभंग कारवाईला स्थगिती

By admin | Updated: May 14, 2016 02:26 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनिर्बान भट्टाचार्य आणि अन्य काही जणांवर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनिर्बान भट्टाचार्य आणि अन्य काही जणांवर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या सर्वांना न्यायालयाने दिलेला हा मोठाच दिलासा आहे.तत्पूर्वी, न्यायालयाने बेमुदत उपोषणावर बसलेल्या या विद्यार्थ्यांना आपले आंदोलन तात्काळ मागे घेण्याचे आवाहन केले होते. न्यायालयाने या विद्यार्थ्यांविरुद्धच्या कारवाईला सशर्त स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ते विद्यापीठात चालू केलेले बेमुदत उपोषण त्वरित थांबवतील आणि भविष्यात विद्यापीठ परिसरात कोणतेही आंदोलन करणार नाहीत. कन्हैया कुमार आणि या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला दिल्ली उच्य न्यायालयात आव्हान दिले होते.या विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या अपिलीय प्राधिकरणाकडे कारवाईविरुद्ध दाद मागितली आहे. त्यावर या प्राधिकरणाने निर्णय घेईपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांनी एक शपथपत्र दाखल करून आपण बेमुदत उपोषण मागे घेत आहोत आणि भविष्यात विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले.