शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

इंदिरानगरला वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: May 28, 2014 01:38 IST

वृक्ष उन्मळले : पाणी साचून वाहतूक कोंडी

वृक्ष उन्मळले : पाणी साचून वाहतूक कोंडीइंदिरानगर : दुपारच्या वादळी पावसाने इंदिरानगर परिसरातही वृक्षांची पडझड झाल्याने अनेक ठिकाणच्या वीजतारा तुटल्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित असल्याने इंदिरानगर परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. वादळीवार्‍यासह रोहिणी नक्षत्रातील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने इंदिरानगर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. राजसारथी सोसायटी, विनयनगरच्या हनुमान मंदिराजवळ, छान हॉटेल, चार्वाक चौक व रथचक्र चौकात वादळीवार्‍यामुळे वृक्ष उन्मळून पडले. काही झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक रस्त्यांवरच झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मंुबई नाका ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपर्यंतच्या समांतर रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. सुचेतानगर, गजानन महाराज मंदिर, मोदकेश्वर मंदिरसह अनेक चौकांमध्ये पाण्याचे तळे साचले होते. राजसारथी सोसायटीसमोरील जाहिरातीचा फलक वादळीवार्‍याने कोसळला. सदरचा फलक अपार्टमेंट वा रस्त्यावर कोसळला असता तर मोठी दूर्घटना घडली असती. परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता.