शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोतील विहिरींना निधीची अडचण

By admin | Updated: April 20, 2015 01:42 IST

सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे.

वर्धा : सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे. या योजनेत जाचक अटी लादण्यात आल्या आहेत़ शिवाय निधीची अडचण असल्याने शेतकरीच संकटात सापडले आहेत़ कार्यालय गट ग्रा़पं़ हिवरा (कावरे) अंतर्गत असलेल्या कोल्हापूर (राव) या गावातील व परिसरातील लाभार्थ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कामे सुरू केलीत; पण निधी मिळत नसल्याने परिसरातील लाभधारक शेतकरी त्रस्त झाले आहे. संबंधित विभागाने मोजमाप करून विहिरीचे खोदकाम सुरू करा, असा तोंडी आदेश दिला. यावरून अल्प व अत्यल्प भूधारक गरीब शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन आपल्या विहिरीची कामे सुरू केली़ यात कामावरील मजुरांना आठवड्याचे पैसे द्यावे लागतात़ शासनाकडून निकषानुसार विहिरीचे पैसे काढताना वेळ होतो. यामुळे पैशासाठी मजूर थांबत नाहीत़ मजुरांना वेळेवर पैसे कुठून द्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. हे वर्ष आधीच शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळाली नाही. यामुळे काही शेतकरी परिस्थितीला झुंज देत आत्महत्या करीत आहे. विहिरीच्या लाभार्थ्यांवरही हीच वेळ आली आहे़ अशा या मंदीच्या काळात शासनाने सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीचा लाभ दिला; पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ निधी उपलब्ध होत नसल्याने गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे़ कर्ज घेऊन विहिरीच्या खोदकामाची मजुरी दिली; पण पूढील खर्च शेतकऱ्यांना झेपणारा नाही़विहिरीच्या कामाचे मोजमाप व संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी झाल्याशिवाय निधी मिळत नाही. संबंधित अधिकारी मात्र तिकडे भटकतही नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम २० ते २५ फुटापर्यंत झाले आहे; पण मोजमाप व पाहणी झाली नाही. यामुळे या विहीरीचा फास शेतकऱ्यांच्या गळाभोवती आवळला जात आहे. कर्ज घेऊन विहिरीचे खोदकाम केले; पण निधी मिळणार की नाही, या साशंकतेमुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)