ओला कच-याची समस्या वाढली शेतक-यांनी कचरा घेणे कमी केल्याने पालिकेच्या अडचणी वाढल्या
By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST
पुणे : महापालिकेकडून शहरातील ओला कचरा जिल्ह्यातील शेतक-यांना शेतीसाठी खत म्हणून गेल्या चार महिन्यांपासून दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने तसेच मान्सूनची चाहूल लागल्याने शेतक-यांकडून घेण्यात येणा-या या कच-याचे प्रमाण शंभर ते दिडशें टनांनी घटले असून त्यामुळे या कच-याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या महापालिका प्रशासनासमोर उभी राहीली आहे.
ओला कच-याची समस्या वाढली शेतक-यांनी कचरा घेणे कमी केल्याने पालिकेच्या अडचणी वाढल्या
पुणे : महापालिकेकडून शहरातील ओला कचरा जिल्ह्यातील शेतक-यांना शेतीसाठी खत म्हणून गेल्या चार महिन्यांपासून दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने तसेच मान्सूनची चाहूल लागल्याने शेतक-यांकडून घेण्यात येणा-या या कच-याचे प्रमाण शंभर ते दिडशें टनांनी घटले असून त्यामुळे या कच-याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या महापालिका प्रशासनासमोर उभी राहीली आहे. जानेवारी 2015 मध्ये उरूळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतर महापालिकेकडून शहरात निर्माण होणारा केवळ सुका कचराच डेपोवर टाकण्यात येत असून ओला कचरा महापालिकेचे बायोगँस प्रकल्प तसेच दिशा आणि अजिंक्य प्रकल्पात जिरविला जात आहे. तर उर्वरीत कचरा महापालिकेच्या हददीजवळील 75 किलोमीटरच्या परिसरातील गावांमधील शेतक-यांसाठी दिला जात आहे. महापालिकेच्या माहितीनुसार गेल्या चार ते पाच महिन्यात तब्बल 80 हजार टन ओला कचरा शेतक-यांना पुरविण्यात आला आहे. मात्र, पावसाळा केव्हाही सुरू होण्याची शक्यता असल्याने आता शेतक-यांकडून कच-याची मागणी कमी आल्याने दररोज सुमारे 400 ते 450 टन शेतक-यांसाठी जाणारा कचरा 250 ते 300 टनांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे या शिल्लक राहणा-या जवळपास 150 ते 200 टन कच-याचे करायचे काय हा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर पावसाळयाच्या तोंडावर उभा आहे.पालिकेस नवीन प्रकल्पांचा आधार मिळणार असला तरी, तूर्तास सध्या निर्माण होणारा ओला कचरा पालिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. ==========================प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवा अन्यथा कारवाई शहरात महापालिकेचे जवळपास 25 बायोगँस प्रकल्प असून त्यांनी क्षमता 100 ते 110 टन ओल्या कच-यावर प्रक्रीया करण्या एवढी आहे. मात्र, या प्रकल्पांना क्षमते एवढा पुरेसा ओला कचरा मिळत नसल्याने हे प्रकल्प अर्धवट क्षमतेवरच सुरू आहेत. त्यामुळे हा नव्याने शिल्लक राहणारा कचरा या प्रकल्पांमध्ये जिरविला जाणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरात असलेल्या बायोगँस प्रकल्पासाठी पूर्ण क्षमते एवढा ओला कचरा पुरविण्याची जबाबदारी संबधित आरोग्य निरिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच प्रकल्पासाठी ओला कचरा न मिळाल्यास संबधित आरोग्य निरिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढले आहे.====================================नवीन प्रकल्प दोन महिन्यात दरम्यान, प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविला जावा यासाठी भवानीपेठ आणि कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हददीत 14 प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचीं एकून क्षमता 60 टनांची आहे. पुढील दोन महिन्यात हे प्रकल्पही सुरू होतील असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात ओल्या कच-यासाठी