शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कर अध्यादेशासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींचा विशेषाधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 01:55 IST

वटहुकुमास मंत्रिमंडळ पूर्वलक्षी प्रभावाने देणार मंजुरी; जगातील गुंतवणूकदारांना आकर्षित करणार

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कॉर्पोरेट करात कपात करण्यासाठी शुक्रवारी रात्री जारी करण्यात आलेल्या अध्यादेशास मंत्रिमंडळाची मंजुरी नसताही राष्ट्रपतींनी आपला विशेष अधिकार (एक्स्ट्रा-आॅर्डिनरी पॉवर) वापरून मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.‘कर कायदे (सुधारणा) अध्यादेश २०१९’ असे या अध्यादेशाचे नाव आहे. अमेरिकेच्या एक आठवड्याच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या काही तास आधीच हा अध्यादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता. त्यावर कोविंद यांनी तातडीने स्वाक्षरीही केली. मंत्रिमंडळ बैठकीसाठी सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. पंतप्रधान आणि एक कॅबिनेट मंत्रीही मंत्रिमंडळ बैठक घेऊ शकतात. तरीही या अध्यादेशास मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. याआधी संसदेतील गोंधळामुळे पारित न होऊ शकलेल्या वित्त विधेयकासाठी राष्ट्रपतींनी हा विशेषाधिकार वापरला आहे. कित्येक दशकांनंतर त्याचा वापर कोविंद यांनी केला. ‘भारत सरकार (कामकाज) नियमां’तील तरतूद त्यासाठी वापरण्यात आली. या तरतुदीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ अध्यादेशास पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी देऊ शकते. पंतप्रधानांच्या २१ सप्टेंबरच्या नियोजित ह्युस्टन (अमेरिका) दौºयाच्या काही तास आधीच अध्यादेश आणण्याचा निर्णय झाला असावा, असे दिसते. वास्तविक बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. वित्तमंत्री निर्मला सीतारामन याही शहरातच होत्या. मात्र, त्या गोव्याला गेल्यानंतर हा ऐतिहासिक अध्यादेश आणण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. अमेरिका आणि जगातील इतर गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा त्यामागील उद्देश असावा, असे दिसते.20 सप्टेंबरच्या सायंकाळी ह्युस्टनला रवाना होण्याच्या आधी शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचे निश्चितपणे म्हणता येते. पंतप्रधानांनी आपला विशेषाधिकार वापरून मंत्रिमंडळाच्या मंजुरीविनाच अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठविला.राष्ट्रपतींनीही आपला विशेषाधिकार वापरून त्यावर स्वाक्षरी केली. आता सप्टेंबरअखेरीस पंतप्रधान भारतात परतल्यावर मंत्रिमंडळ या अध्यादेशास मंजुरी देईल.कंपन्यांना सवलतकॉर्पोरेट करात कपात करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशामुळे देशांतर्गत कंपन्यांना इतर कर सवलती न घेण्याच्या अटीवर २२ टक्के दराने प्राप्तिकर देण्याची सवलत मिळाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंद