शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

पाच कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेत कैदी पलायन प्रकरण : उपमहानिरीक्षकांकडून कारागृहात झाडाझडती

By admin | Updated: June 1, 2016 20:54 IST

जळगाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून तेव्हाच नेमकी काय कारवाई करायची याचे स्वरुप ठरवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बुधवारी ते जळगावला आले होते. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले.

जळगाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून तेव्हाच नेमकी काय कारवाई करायची याचे स्वरुप ठरवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. बुधवारी ते जळगावला आले होते. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले.
गेल्या आठवड्यात सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भील्लवाडी, बोदवड) या कैद्याने कारागृहाची भिंत ओलांडून पलायन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बोदवड शिवारातील जंगलातून त्याला ताब्यात घेतले.न्यायालयात हजर केल्यानंतर बुधवारी त्याला दुपारी साडे तीन वाजता कारागृहात नेण्यात आले.
कैद्याची केली चौकशी
धामणे हे औरंगाबाद येथून संध्याकाळी सव्वा पाच वाजता जिल्हा कारागृहात आले व सहा वाजता ते कारागृहाचे बाहेर पडले. या चाळीस मिनिटाच्या काळात त्यांनी पलायन केलेल्या कैद्याची चौकशी केली. तू मुख्य दरवाजातूनच बाहेर गेला असे त्यांनी त्याच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मी भिंतीवरून गेलो असे सांगितले. यावेळी धामणे यांनी कैदाला सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. तो भिंतीवर कसा चढला हे जाणून घेतले. यावेळी त्यांनी कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांच्यासह कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली. दरम्यान, भिंतीवरून उडी मारल्यामुळे पायाला मुका मार लागल्यामुळे या कैद्याला आता चालताना त्रास होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नावे सांगण्यास नकार
या प्रकरणात दोषी आढळलेल्या कर्मचार्‍यांची नावे सांगण्यास धामणे यांनी नकार दिला, अधिकार्‍यांवरही कारवाई होणार का? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. खात्यांतर्गत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावरच नावेही स्पष्ट होतील, यात नावे कमी जास्तही होऊ शकतात, असेही ते म्हणाले.
तीनशे कर्मचार्‍यांची भरती
कारागृहात रिक्त असलेल्या जागा भरण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. मराठवाडा व खान्देश उपविभागात १८ कारागृह येतात. त्यात सुरक्षा रक्षकांची २०१ व अधिकार्‍यांची ८९ पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. दरम्यान, कैदी पलायनाच्या पार्श्वभूमीवर धामणे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.