शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदीच करणार अतुल्य भारतचे ब्रँडिंग

By admin | Updated: November 7, 2016 06:57 IST

विदेशी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यास अतुल्य भारत अभियानाचा जगभर प्रचार व प्रसार घडवण्यासाठी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने अखेर पंतप्रधान मोदींचा चेहरा निवडला आहे.

नवी दिल्ली : विदेशी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वाढवण्यास अतुल्य भारत (इनके्रडिबल इंडिया) अभियानाचा जगभर प्रचार व प्रसार घडवण्यासाठी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने अखेर पंतप्रधान मोदींचा चेहरा निवडला आहे. अमिताभ बच्चन अथवा लोकप्रिय कलावंताला या अभियानाशी जोडण्याचा विचार मंत्रालयाने सोडून दिला. अभिनेता आमिर खान याला ब्रँड अ‍ॅम्बॅसिडरपदावरून हटवल्यापासून हे पद रिक्त होते.लवकरच या प्रचार व प्रसार अभियानासाठी एजन्सीचीही निवड करण्यात येईल. ते दिड ते दोन महिने जगभर चालेल. अतुल्य भारत अभियान असे राबविणार...गेल्या अडीच वर्षात भारतात व जगातल्या विविध देशात, पंतप्रधानांनी पर्यटनाविषयी ज्या आधुनिक संकल्पना आपल्या संबोधनातून मांडल्या, भारताच्या विविधते विषयी व गुणवैशिष्ठ्यांबाबत त्यात देशातल्या अनेक पर्यटन स्थळांचा उल्लेख केला आहे. ही बाब लक्षात घेउन पंतप्रधानांच्या संबोधनाच्या आॅडिओ आणि व्हिडीओचा या अभियानाच्या जाहिरातीत आता वापर करण्यात येईल. अतुल्य भारत अभियानात विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे व्यक्तिमत्व आणि चेहरा सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. अडीच वर्षात पंतप्रधान मोदी ज्या देशात गेले, तिथल्या पर्यटकांची संख्या भारतात वाढली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने पंतप्रधान मोदींचा चेहरा अत्यंत विचारपूर्वक निवडला आहे.- महेश शर्मा, पर्यटन मंत्री