शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांचा गौरव

By admin | Updated: April 22, 2016 03:00 IST

चंदीगडचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे सुपुत्र अजित जोशी यांना जनधन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार देउन पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : चंदीगडचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे सुपुत्र अजित जोशी यांना जनधन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार देउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी गौरवण्यात आले. अजित जोशी हे २00३ च्या भारतीय प्रशासकीय तुकडीतील अधिकारी असून, ते हरयाणा केडरमध्ये आहेत. राष्ट्रीय स्तरावर लोक प्रशासनात उत्कृष्ट व नावीन्यूपर्व कामगिरी करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी होणाऱ्या नागरी सेवा दिनी गौरवण्यात येते.जोशी यांनी प्रभावी प्रचार व प्रसार यंत्रणा राबवून मुदतीपूर्वीच जनधन योजनेची २ लाख २0 हजार खाती उघडली. अटल पेन्शन योजना व अन्य योजना यांना जनधन योजनेशी जोडून दीड लाख लोकांना विमा कवच मिळवून दिले. तसेच खातेदाराच्या मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत विम्याची रक्कम त्याच्या नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभी केली. पानिपत येथे काम करीत असताना हरयाणा व महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी त्यांनी पानिपत महोत्सव सुरू केला. तसेच मोहाना येथील दलित हत्याकांडाच्या वेळी त्यांनी केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. झज्जर येथे काम करीत असताना वीटभट्ठ्यांवरील मुलांसाठी भट्टीशाळा योजनाही त्यांनी राबवली होती. त्याबद्दल तत्कालिन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्यांचे कौतुक केले होते. सोनीपतमधील लोकांच्या मदतीने त्यांनी बिहारमधील कोसी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मुसहेरी या महादलितांच्या गावाचे पुनर्वसन करून, त्या गावाला विकासाचा मार्ग दाखवला होता. त्याबद्दल हरयाणाचे तेव्हाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अजित जोशी यांना शाबासकी दिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)