शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मान्सूनचे भाकीत अधिक अचूक असणार

By admin | Updated: April 22, 2016 02:58 IST

भारतात मान्सूनचे आगमन कधी होणार आणि तो निरोप कधी घेणार याचे भाकीत आता पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक अर्थपूर्णरीत्या करता येणार आहे.

बर्लिन : भारतात मान्सूनचे आगमन कधी होणार आणि तो निरोप कधी घेणार याचे भाकीत आता पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक अर्थपूर्णरीत्या करता येणार आहे. शास्त्रज्ञांनी ही नवी पद्धत विकसित केली असून, त्यामुळे भारतीय उपखंडातील शेती आणि जलविद्युत प्रकल्पांना पाणीपुरवठ्याचे जास्तीत जास्त चांगले नियोजन करतायेईल.ही नवी पद्धत विभागीय हवामानाच्या उपलब्ध माहितीच्या विश्लेषणावर आधारित आहे. संशोधक हीच पद्धत भारतीय हवामान विभागानेही अवलंबवावी, असे सांगतील. भारतीय उपखंडातील लोकसंख्येचे भरणपोषण करणाऱ्या लक्षावधी शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे होणाऱ्या हवामानातील बदलाचा मान्सूनच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो व त्यामुळे नेमके भाकीत हे अधिक प्रासंगिकठरेल. ‘भारतीय मान्सून कधी सुरू होणार याचे भाकीत आम्ही दोन आठवडे आणि तो कधी निरोप घेणार याचे भाकीत सहा आठवडे आधी करू शकतो. हे सगळेच जो शेतकरी रोज एकेक दिवस मोजतो आहे त्याच्यासाठी मोठे महत्त्वाचे आहे,’ असे व्हेरोनिका स्टोलबोवा यांनी म्हटले. स्टोलबोवा या जर्मनीतील पोट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने केलेल्या या संशोधनाच्या प्रमुख आहेत. व्हेरोनिका स्टोलबोवा म्हणाल्या की, ‘उत्तर पाकिस्तान आणि पूर्वघाटात भारतीय महासागराच्या जवळ असलेल्या पहाडी पट्ट्यात तापमान आणि आर्द्रतेतील बदलाचा परिणाम मान्सूनच्या संक्रमणावर महत्त्वाचा म्हणता येईल, असा होणार आहे. (वृत्तसंस्था)पूर्वापर चालत आलेल्या पद्धतीनुसार मान्सूनच्या आगमनाच्या भाकितासाठी दक्षिण भारताच्या केरळ विभागावरच लक्ष केंद्रित झालेले आहे. भाताच्या लागवडीसाठी पाऊस पडण्याची वेळ अतिशय महत्त्वाची असते. तसेच जलविद्युत प्रकल्पांसाठीही ती महत्त्वाची आहे. भारतीय शेतकऱ्यांना तांदूळ, सोयाबीन, कापसाची लागवड कधी करायची याचा निर्णय घेण्यासाठी मान्सूनची वेळ खूप महत्त्वाची असते. कारण ही पिके साधारणत: जून ते सप्टेंबर या कालावधीतील आहेत.शिवाय मान्सूनचा कालावधी हा जलविद्युत प्रकल्पांतून किती दिवस वीजनिर्मिती करायची याच्या नियोजनासाठीही महत्त्वाचा असतो. कारण धरणे आणि जलसाठे पाण्याने भरलेली असणे गरजेचे असते, असेही त्यांनी सांगितले. संशोधकांनी या पद्धतीची चाचणी आतापर्यंतच्या मान्सूनच्या आकडेवारीशी करून घेतली आहे. या पद्धतीने मान्सूनच्या आगमनाचे भाकीत ७० टक्के, तर त्याच्या निरोपाचे भाकीत ८० टक्के खरे ठरले आहे. हा अभ्यास जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.