शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये झाले शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: September 26, 2014 23:29 IST

उरणमध्ये आज काँग्रेसच्यावतीने महेंद्र घरत यांनी, तर शिवसेनेच्यावतीने मनोहर भोईर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

चिरनेर : उरणमध्ये आज काँग्रेसच्यावतीने महेंद्र घरत यांनी, तर शिवसेनेच्यावतीने मनोहर भोईर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही पक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली. उरण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वात पहिला उमेदवारी अर्ज उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी भरला आहे, तर गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची रांगच लागली आहे. यामध्ये आज महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कोटनाक्यापासून सुरू झालेल्या रॅलीचे पहिले टोक राजपाल नाक्यावर होते, तर शेवटचे टोक राघोबादेव मंदिरापर्यंत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रॅलीत सहभागी झालेले दिसून येत होते, मात्र काँग्रेसकडे तिकिट मागितलेला दुसरा एकही काँग्रेसचा नेता यावेळी उपस्थित नव्हता. दरम्यान, मनोहरशेठ भोईर यांनीही शिवसेनेच्यावतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनीही राघोबादेव मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत भलीमोठी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (वार्ताहर)