शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 21:27 IST

सात जणांना पद्मविभूषण जाहीर; पद्मभूषण पुरस्कारासाठी १६ जणांची निवड

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे. यंदा सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मॉरिशसचे माजी पंतप्रधान अ‍ॅनरुड जुगनॉथ, बॉक्सिंगपटू मेरी कोम, चन्नूलाल मिश्रा, विश्वेष तीर्थ स्वामी (मरणोत्तर) यांचादेखील पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं यंदा पद्मविभूषण सन्मानासाठी सात जणांची निवड केली आहे. तर पद्मभूषण पुरस्कारासाठी १६ जणांची निवड केली आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह उद्योगपती आनंद महिंद्रा, वेणू श्रीनिवासन, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, नागालँडचे माजी मुख्यमंत्री सी. जे. जमीर, जम्मू काश्मीरमधले नेते मुझफ्फर हुसेन बेग यांच्या नावाचा समावेश आहे. पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र सरकारनं ११८ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये झहीर खान, पोपटराव पवार, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, राहीबाई पोपेरे, सुरेश वाडकर, कंगना राणौत, अदनान सामी, एकता कपूर यांचा समावेश आहे. याशिवाय बेंबेम देवी (फुटबॉल), एम. पी. गणेश (हॉकी), जीतू राय (नेमबाजी), तरुणदिप राय (तिरंदाजी), राणी रामपाल (हॉकी) यांनादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.