शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मंत्रिमंडळ बदलाची शक्यता तूर्त नाही

By admin | Updated: May 11, 2016 03:28 IST

नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्षे होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची वा खांदेपालट, बदल यांची चर्चा मात्र होताना दिसत नाही.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्षे होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची वा खांदेपालट, बदल यांची चर्चा मात्र होताना दिसत नाही. मंत्री आणि खासदार या दोन वर्षांतील सरकारची कामगिरी आणि संसदेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी अडविलेले कायदे आणि कल्याणकारी योजनांची माहिती द्या, अशा सूचना मंगळवारी खासदारांना दिल्या. खासदार व मंत्री यांच्या एकूणच कामाचा आणि विशेषत: दोन महिन्यात ते मतदारसंघात ज्या पद्धतीने वातावरण तयार करतात, याचा आढावा, स्वत: पंतप्रधान करणार आहेत. तोपर्यंत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची अजिबात शक्यता नाही. हे खासदार पक्षाचा आणि सरकारचा कितपत प्रभावीपणे प्रचार करतात , हे पाहून मंत्रिमंडळातील बदलांचा विचार होण्याची शक्यता दिसत आहे. मोदी यांना मंत्रिमंडळात बदलांची घाई नाही, असे दिसत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात, हे ते पाहणार आहेत. त्यानंतर ११ व १२ जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यावेळी पक्षात आवश्यक ते बदल केले जातील, असे दिसते. त्यानंतर राज्यसभेत पाठवण्याच्या पंधरा जणांविषयीही निर्णय होईल. तोपर्यंत मंत्रिमंडळात बदलांची शक्यता नाही. सुषमा स्वराज यांची प्रकृती आणि पुन्हा गोव्यात जाण्यास उत्सुक असलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर या पंतप्रधानांसाठी चिंतेच्या बाबी आहेत. संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रसाद रुडी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की नरेंद्र मोदी बैठकीत सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलले. सगळ््या मंत्र्यांनी देशातील महत्वाच्या २०० ठिकाणी जाऊन सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांना माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. सरकार कोणते कायदे करू इच्छिते व कोणत्या लोकांमुळे अडथळे आले हेदेखील खासदार मंडळी लोकांना जाऊन सांगणार आहेत.