पोलीस कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
अहमदनगर : र्शीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल सोमनाथ अर्जुन बांगर याला दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहर पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरासमोर रंगेहाथ पकडले.
पोलीस कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
अहमदनगर : र्शीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल सोमनाथ अर्जुन बांगर याला दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहर पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरासमोर रंगेहाथ पकडले.याबाबत शामाबाई परदेशी हिने तक्रार केली होती. त्यानुसार तिचा मुलगा र्शीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल एका गुनत आरोपी आहे. त्याला दुसर्या नव्या गुनत वर्ग करू नये, तसेच पहिल्या गुनत सहकार्य करावे, यासाठी काँस्टेबल बांगर याने 3 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे परदेशी हिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. (प्रतिनिधी)