शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मारहाण प्रकरणी पोलीस कोठडी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

पुणे : वाघेश्वर यात्रेदरम्यान कुस्ती बरोबरीत सोडल्याच्या कारणावरुन यात्रा कमिटी आणि पोलिसांना मारहाण करणा-या १३ जणांना शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कुलकर्णी यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना गुरुवारी शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावामध्ये घडली होती.

पुणे : वाघेश्वर यात्रेदरम्यान कुस्ती बरोबरीत सोडल्याच्या कारणावरुन यात्रा कमिटी आणि पोलिसांना मारहाण करणा-या १३ जणांना शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कुलकर्णी यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना गुरुवारी शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावामध्ये घडली होती.
बाळासाहेब कोळपे, भानुदास कोळपे, दादासाहेब कोळपे, रामभाऊ थोरात, बबन कोळपे, तात्याबा शेंडगे, सिदा शेंडगे, बाळासाहेब कोळपे, जगु कोळपे, बापु वाघमोडे, बाळु कारंडे, बिरा कोकरे, गणेश टेंगलेे, गणेश टेंगलेे, दादा कोळपे, भाऊसाहेब येळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल लडकत यांनी फिर्याद दिली आहे. लडकत आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोलते, कारंडे या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोंधळाप्रकरणी एकूण शुक्रवारी ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरकारी वकील निलेश लडकत यांनी आरोपींकडे अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. त्यांची मागणी मान्य करीत न्यायालयाने अरोपींना पोलीस कोठडी सुनावली.