कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेत
By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST
नाशिकच्या विद्यार्थ्यांची बाजी
कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेत
नाशिकच्या विद्यार्थ्यांची बाजीबारामती : राज्यभर नावलौकिक असणार्या बारामती येथील कविवर्य मोरोपंत वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धकांचा कस लागणार्या या स्पर्धेला महाराष्ट्रातील महाविद्यालयांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ विभागाच्या वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद नाशिकच्या विवेक चित्ते याने पटकावले, तर कनिष्ठ विभागात दौंडच्या प्रशांत जाधव याने बाजी मारली. तर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगरच्या रोहित देशमुख याने विजेतेपद मिळविले. कविवर्य मोरोपंत स्पर्धेचे हे ४३ वे वर्ष आहे. १४ व १५ सप्टेंबरला या स्पर्धा पार पडल्या. नाशिकचे केटीएचएम महाविद्यालयाचा संघ वादविवाद स्पर्धेत मानकरी ठरला. यामध्ये हर्षाली घुले, अमोल गुे यांनी सहभाग नोंदवला होता. तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी ज्येष्ठ विचारवंत महावीर जोंधळे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात आले. या वेळी जोंधळे म्हणाले, की यासारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांमधून चांगले वक्ते घडवितात. तरुण पिढीमध्ये वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरतात. या वेळी अनेकान्त एज्युुकेशन सोसायटीचे सचिव जवाहर शहा, विकास शहा, डॉ. राजेंद्र छाजेड, प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर, उपप्राचार्य एम. के. कोकरे, डॉ. शिवाजी साठे, अभिनंदन शहा, दिलीप ढवाण, लेखिका इंदुमती जोंधळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. रंजना नेमाडे यांनी केले, तर आभार डॉ. संदीप तापकीर यांनी मानले. स्पर्धेचा निकाल : कनिष्ठ विभाग, प्रथम- प्रशांत जाधव (दौंड), द्वितीय- भक्ती कदम (स्वामी चिंचोली), तृतीय- प्रणव व्यवहारे (बारामती), वरिष्ठ विभाग, प्रथम- विवेक चित्ते (नाशिक), द्वितीय- अय्याज शेख (बारामती), तृतीय-हर्षाली घुले (नाशिक), वादविवाद स्पर्धा : प्रथम- केटीएचएम महाविद्यालय नाशिक, द्वितीय- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा : प्रथम- रोहित देशमुख (अहमदनगर), द्वितीय- काजल बोरसे (नाशिक), तृतीय - योगेश पाटील (अंमळनेर)