शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पीएमटी निकालास ‘सर्वोच्च’ स्थगिती!

By admin | Updated: June 4, 2015 00:43 IST

अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचा (एआयपीएमटी) निकाल १० जूनपर्यंत लावू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीएसईला दिल्यामुळे

नवी दिल्ली : अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचा (एआयपीएमटी) निकाल १० जूनपर्यंत लावू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीएसईला दिल्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून पेपरफुटीमुळे ही परीक्षा वादग्रस्त ठरली.हरियाणा पोलिसांना लाभार्थ्यांची नेमकी संख्या स्पष्ट करण्यासह नवा अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देतानाच या न्यायालयाने फेरपरीक्षेबाबत १० जून रोजी सुनावणी निश्चित केली आहे. सीबीएसईने ही परीक्षा देणाऱ्या सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल ५ जून रोजी घोषित करण्याची तयारी चालविली होती. ३ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील पेपरफूट व अनियमितता पाहता फेरपरीक्षा घेण्याची मागणी एका याचिकेत करण्यात आली होती.न्या. पी. सी. पंत व अमितावा रॉय यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने १० जून रोजी पोलिसांकडून स्थिती अहवाल मिळाल्यानंतर त्याबाबत निर्णय देण्याचे ठरविले. परीक्षेच्या शुचितेबाबत संशय निर्माण झाला असताना निकाल जाहीर होणे हा मोठा मुद्दा असल्याची आम्हाला जाणीव आहे. पुन्हा फेरपरीक्षा घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही, मात्र हा निर्णय आम्हाला घिसाडघाईने घ्यायचा नाही. तपास पूर्ण व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. भविष्यातील कारवाईबाबत निर्णय घेणे महत्त्वाचे, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)