रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
मिळेल त्या मार्गाचा वापर करून सत्तेचा सोपान गाठण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी थेट पंतप्रधान कार्यालय गाठले आहे! मागील आठ दिवसांत राज्यातून अनेक पत्रे या पंतप्रधान कार्यालयाच्या नोंदणी कार्यालयात गोळा झाली आहेत. विशेष म्हणजे, यातील काही पत्रंची दखल स्वत: मोदी यांनी घेतली असून ‘लक्ष घाला’असा अभिप्राय लिहून ती पक्षाकडे पाठविल्याचे सूत्रंनी सांगितले.
संघ प्रचारक राहिलेले पंतप्रधान होतात, या चमत्काराच्या मानसिकतेतून संघ व सामाजिक कार्यकर्ते बाहेर पडलेले नाहीत. पंतप्रधानांनाच खुशाल सल्ला देऊन काही कार्यकत्र्यानी उमेदवारी मागितली आहे. कार्यकत्र्यानी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रत अन्याय झाल्याचा दावा, पक्ष धनिकांच्या ताब्यात जातो की काय याची भिती, संघाशी असलेले नाते, नावानिशी ज्येष्ठ नेत्यांशी असलेली सलगी, थोरामोठय़ा सेलिब्रिटीजशी असलेला स्नेह असे नानाविध तपशील नमूद केले आहेत. त्यासाठी लता मंगेशकरांपासून उद्योगपतींर्पयतची नावे नमूद केली आहेत.
मुलांना जागा द्या !
एका व्यक्तीने तर आजवरच्या भाजपाच्या यात्रंचे उल्लेख करून आपण कशी वातावरण निर्मिती केली होती, याचे स्मरण दिले आहे. आमची पिढी खस्ता खावून संपली आता मुलांना राजकारणात जागा द्या, अशी विनंती एकाने केली आहे..असे अनेकानेक मुद्दे असलेली अफलातून पत्रे हिंदी व मराठीतून मराठवाडा, विदर्भातून आली आहेत. इंग्रजी व मराठीतून पुण्यातून, मुंबईतून आलेली पत्रे मराठीत व त्याचाच इंग्रजी व हिंदी अनुवाद असलेली आहेत. एक पत्र संस्कृतमधून आले आह, असे सूत्रंनी सांगितले.