श्वानाच्या अँटी रेबीज इंजेक्शनसाठी ७५० रुपयांची वसुलीनाशिक : जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयात उपचारासाठी येणार्या जनावरांच्या मालकांची सहायक उपआयुक्तांकडून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार आवास या सेवाभावी संस्थेचे संस्थापक व ॲनिमल वेल्फे अर ऑफि सर गौरव क्षत्रिय यांनी पशुसंवर्धन उपआयुक्तांकडे केली आहे़ पशू तसेच श्वानमालकांची आर्थिक लूट करणार्या या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणीही क्षत्रिय यांनी केली आहे़क्षत्रिय यांनी केलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील श्रेयस खेताडे हा युवक चार महिन्याच्या पामोलिन कुत्रीला ॲन्टीरेबीजचे इंजेक्शन देण्यासाठी चिकित्सालयात घेऊन आला़ या ठिकाणी कार्यरत असलेले सहायक उपआयुक्त राजे यांनी खेताडे यांच्या कुत्रीला लसीकरण केल्यानंतर त्यांच्याकडून साडेसातशे रुपये घेतले़ पैसे घेतल्याची कच्ची पावती व औषधांची चिठ्ठीही त्यांनी खेताडे यांनी दिली़ खेताडे औषधे घेण्यासाठी गेले असता त्यांनी इंजेक्शनच्या किमतीची चौकशी केली असता मेडिकल दुकानदाराने त्यांना तीनशे रुपये सांगितली़राजे यांनी लसीकरणासाठी घेतलेल्या अवास्तव पैशाचा खेताडे यांनी जाब विचारला असता राजे यांनी उर्वरित पैसे खेताडे यांनी परतही केले़ या घटनेप्रसंगी ॲनिमल वेल्फे अर ऑफि सर व आवास या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक गौरव क्षत्रिय या ठिकाणी उपस्थित होते़ त्यांनी या राजे यांच्याकडून केल्या जाणार्या लुटीबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ़ पी़ आऱ झांबरे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे़ दरम्यान, आजची ही एकच घटना नसून उपआयुक्त राजे हे पशुमालकांची रोजच लूट करीत असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)या बातमीला जोड आहे़
जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयात पशुमालकांची लूट
By admin | Updated: June 4, 2014 01:51 IST