शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विमानाचे शेपूट सापडले

By admin | Updated: January 7, 2015 23:57 IST

एअर आशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शेपटाकडील भाग बुधवारी जावा समुद्रात सापडला. त्यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे.

जकार्ता/सिंगापूर : एअर आशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शेपटाकडील भाग बुधवारी जावा समुद्रात सापडला. त्यामुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे. आम्हाला विमानाचे शेपूट सापडले आहे. आम्ही आता ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. सापडलेले अवशेष हे विमानाचे शेपूट असल्याचे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो, कारण त्यावर एअर आशियाची खूण आहे, असे इंडोनेशियाच्या शोध व बचाव मोहिमेचे प्रमुख बाम्बंग सोएलियस्तो यांनी सांगितले. विमानाचा संपर्क जेथे तुटला तेथून ३० कि.मी. अंतरावर विमानाचा पाठीमागील भाग आढळून आला. विमानाच्या शेपटाकडील भागातच ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्समधून विमानाचा वेग, लँडिंग गीअरची स्थिती आणि वैमानिकाच्या संवादाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे विमान दुर्घटनेच्या चौकशीत नेहमीच ब्लॅक बॉक्सला एक महत्त्वपूर्ण पुरावा मानले जाते. पाण्यात शोधकार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राने विमानाचा पाठीमागील भाग हुडकून काढला. त्यानंतर सूरमाऱ्यांनी तेथे जाऊन त्याची ओळख पटविली. एअर आशियाचे क्यूझेड ८५०१ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यापासून आतापर्यंत ४० मृतदेह हाती लागले आहेत. विमानात एकूण १६२ प्रवासी होते. २८ डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या या विमानाचे अवशेष हुडकून काढण्यासाठी जावा समुद्रात शोधमोहीम सुरू आहे. (वृत्तसंस्था)विमानाचे शेपूट सापडल्याचे एअर आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांनी टष्ट्वीटरवर म्हटले आहे. विमानाच्या पाठीमागचा योग्य भाग सापडला असेल तर त्यात ब्लॅक बॉक्स असतील. आम्हाला विमानाच्या सर्व भागांचा लवकरात लवकर शोध घ्यायचा आहे, जेणेकरून उर्वरित मृतदेह हुडकून मृतांच्या कुटुंबियांच्या वेदना कमी करता येऊ शकतील, असेही त्यांनी टष्ट्वीटरवर म्हटले आहे.