शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'मॅकडोनल्ड'च्या 'फ्रेंच फ्राइज'मध्ये आढळली मेलेली पाल

By admin | Updated: March 2, 2017 18:46 IST

फास्ट फूड पदार्थांसाठी तरूणांचं आवडीचं ठिकाण मॅकडोनल्डच्या फ्रेंच फ्राइजमध्ये मेलेली पाल आढळल्याची गंभीर घटना समोर

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 2 - फास्ट फूड पदार्थांसाठी तरूणांचं आवडीचं ठिकाण मॅकडोनल्डच्या फ्रेंच फ्राइजमध्ये मेलेली पाल आढळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कोलकाताच्या  ईएम बायपास येथील मॅकडोनल्डच्या आउटलेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली.  घटनेवर आउटलेटच्या मॅनेजरने समाधानकारक उत्तर न देता हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला.  याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कालकातायेथील रहिवासी प्रियंका मित्रा आपल्या मुलीसोबत  ईएम बायपास येथील मॅकडोनल्डमध्ये गेल्या आणि मुलीसाठी फ्रेंच फ्राइजची ऑर्डर दिली. मुलगी राजनंदिनी  फ्रेंच फ्राइज खाण्यात व्यस्त असताना  फ्रेंच फ्राइजच्या पाकिटात पाल असल्याचं प्रियंका यांना दिसलं. आउटलेटच्या मॅनेजरला त्यांनी याबबात तक्रार केली. 
 
मात्र, मॅनेजरने कोणतही समाधानकारक उत्तर न देता केवळ सॉरी बोलून झालेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रियंका यांनी केला आहे.  त्या नंतर प्रियंका यांनी फ्रेंच फ्राइजच्या पाकिटाचा फोटो काढला आणि पोलीस स्थानकात जाऊन एफआयआर दाखल केली आहे. 
 
प्रियंका यांचे पती संजय मित्रा यांनी याबाबत दिल्लीच्या मॅकडोनल्ड ऑफीसमध्येही संपर्क साधला मात्र, त्यांनीही बेजबाबदारपणे उत्तरं दिली. प्रियंका या गर्भवती असून झालेल्या घटनेनंतर त्या अस्वस्थ आहेत . जर त्या पाकिटावर लक्ष गेलं नसतं तर काय झालं असतं या विचाराने त्या विचलीत होतात, असं त्यांच्या पतीने सांगितलं. 
 
यासोबत मॅक-डीमध्ये काहीही खाण्याआधी सतर्कता बाळगा असं आवाहन त्यांनी सर्व मॅक-डी लव्हर्सना केलं आहे