शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बिष्णूपुरामधील टेराकोटा मंदिरांच्या छायाचित्रांची रसिकांना भुरळ

By admin | Updated: February 6, 2016 00:42 IST

नाशिक : पश्चिम बंगालमधील बांकूरा जिल्‘ातील भगवान विष्णूच्या नावावरून स्थापित झालेले बिष्णूपुरा हे गाव़ या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जुनी तटबंदी आणि टेराकोटाने बांधलेली आकर्षक अशी तीस मंदिरे अन् शिल्पाकृती़ वास्तुकला, संगीत व हस्तकलेचे प्रतीक असलेल्या या मंदिरांची अनुभूती नाशिककरांना छायाचित्रांच्या माध्यमांतून हार्मनी आर्ट गॅलरीत बघता येणार आहे़ आर्किटेक्ट संजय पाटील यांनी काढलेल्या या मंदिरांची छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि़ ५) पासून सुरू झाले आहे़

नाशिक : पश्चिम बंगालमधील बांकूरा जिल्‘ातील भगवान विष्णूच्या नावावरून स्थापित झालेले बिष्णूपुरा हे गाव़ या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जुनी तटबंदी आणि टेराकोटाने बांधलेली आकर्षक अशी तीस मंदिरे अन् शिल्पाकृती़ वास्तुकला, संगीत व हस्तकलेचे प्रतीक असलेल्या या मंदिरांची अनुभूती नाशिककरांना छायाचित्रांच्या माध्यमांतून हार्मनी आर्ट गॅलरीत बघता येणार आहे़ आर्किटेक्ट संजय पाटील यांनी काढलेल्या या मंदिरांची छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि़ ५) पासून सुरू झाले आहे़मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार व वास्तुविशारद यशवंत पिटकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले़ गुप्त काळातील इतिहास असलेले बिष्णूपूर हे हिंदू व मल्ल राजाच्या राजधानी अंतर्गत होते़ मल्ल राजा हा विष्णूचा अनुयायी असल्याने भगवान विष्णूचा अवतार असलेले श्रीकृष्ण, राधा यांची या मंदिरांमध्ये पूजा केली जाते़ उत्कृष्ट कारागिरांची कला दर्शविणारी मंदिराची वास्तुकला ही बंगाल टेराकोटा कलेच्या शास्त्रीय शैलीचे उत्तम उदाहरण असल्याचे पाटील यांनी सांगितले़या प्रदर्शनामध्ये बिष्णूपुरामधील जुने वीटकाम असलेले रासमंच मंदिर, एकरत्न शैलीतील राधेश्याम मंदिर, पंच सुळके असलेले श्यामराई मंदिर, कृष्णलीलेची दृश्य अलंकृत पद्धतीने कोरलेले जोर बंगला मंदिर यांचे अप्रतिम फोटो आहेत़ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी वास्तुविशारद दीपक देवरे, चित्रकार राजेश सावंत उपस्थित होते़ दि. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे़ (प्रतिनिधी)फोटो :- ०५पीएचएफबी ८०हार्मनी आर्ट गॅलरीमध्ये सुरू झालेल्या बिष्णूपुरामधील टेराकोटा मंदिर छायाचित्र प्रदर्शनात छायाचित्रांबाबत माहिती देताना आर्किटेक्ट संजय पाटील़फोटो :- ०५पीएचएफबी ७४ ते ७७ व ७९बिष्णूपुरामधील टेराकोटा मंदिरे़