पवार फार्मसी महाविद्यालयात औषध साक्षरता अभियान
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
कळवण : तालुक्यातील लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे बुधवारी (दि. ४) औषध साक्षरता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे ड्रग इन्स्पेक्टर डी. एम. दरंदले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पवार फार्मसी महाविद्यालयात औषध साक्षरता अभियान
कळवण : तालुक्यातील लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे बुधवारी (दि. ४) औषध साक्षरता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे ड्रग इन्स्पेक्टर डी. एम. दरंदले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.औषध साक्षरता अभियानाचे प्रास्तविक बी. फार्मसीचे प्राचार्य अविष मारू यांनी केले. दरंदले यांनी औषध व सौंदर्यप्रसाधनासंबंधी अस्तित्वात असलेले कायदे, नियम यांची माहिती दिली. आजचे विद्यार्थी म्हणजेच भावी नोंदणीकृत फार्मसिस्ट यांनी औषध खरेदी-विक्री करताना, साठवण करतानाची जबाबदारी व कर्तव्ये यासंबंधी माहिती दिली. ग्राहक तथा पेशंट यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने औषध खरेदी करू नये, तथा खरेदीचे बिल देण्याचा दुकानदारास आग्रह धरावा, औषध लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यावी, औषध अथवा सौंदर्यप्रसाधनांच्या गुणवत्तेबाबत काही संशय असल्यास खरेदी बिलसह अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. शेवटी चर्चासत्रात भाग घेताना अनेक विद्यार्थ्यांनी शंका व प्रश्न विचारले. त्या सर्वांचे दरंदले यांनी सविस्तर उत्तर देऊन समाधान केले. डी. फार्मसीचे प्राचार्य किशोर कोठावदे यांनी सर्वांचे आभार मानले. (वाणिज्य प्रतिनिधी)