शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जनताच या गद्दाराला गाडेल - दिलीप लांडे

By admin | Updated: October 7, 2014 06:40 IST

विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल,

मुंबई : विकासकामे, सर्वसामान्य-गोरगरिबांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याऐवजी कीर्तनात रमलेल्यांना जनताच गाडून टाकेल, असा विश्वास घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी व्यक्त केला.काल श्रेयस सिग्लनजवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणात राज यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपामध्ये उडी घेणाऱ्या राम कदम यांना गद्दार असे संबोधले. तो (राम कदम) आमच्यासाठी मेला, असे सांगत गद्दारांना थारा देऊ नका, असे वक्तव्य केले. कदम विधानसभेत कधी गेलेच नाहीत. त्यांनी आमदार निधीचा वापर मतदारसंघातील गोरगरिबांसाठी करण्याऐवजी फस्त केला. कशाला हवेत असे आमदार, अशी टीका राज यांनी केली.त्याआधी उमेदवार लांडे यांचे भाषण झाले. त्या वेळी कदम यांनी आमदार म्हणून निवडून येताच पक्ष संघटना खिळखिळी केली. त्यामुळे पक्षाने मला पक्षबांधणीची जबाबदारी दिली. जेव्हा मी या मतदारसंघात फिरलो तेव्हा येथे रस्ते, शौचालयांसह प्रत्येक मूलभूत सुविधांची बोंब आढळली. शौचालयांना साधे दरवाजेही नव्हते. ही अशी गाऱ्हाणी घेऊन येथील जनता मनसेच्या शाखेत येऊ लागली. त्यांच्या अडचणी मी ४८ तासांच्या आत सोडविल्या, असा दावा लांडे यांनी आपल्या भाषणात केला.या वेळी लांडे यांनी कदमांवर जोरदार टीका केली. या घरेलू कामगार महिलांच्या मुलांना ताज हॉटेलमध्ये जेवू घातल्याचा दावा कदम करतात. प्रत्यक्षात मात्र या मुलांना हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बसविण्यात आले. घाटकोपरमधल्याच एका चायनिज सेंटरमध्ये बनलेले फ्राइड राइस, सूप कागदी थाळ्यांमध्ये वाढले गेले, असा दावा लांडे यांनी केला. (प्रतिनिधी)