शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पेमा खांडू देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2016 06:02 IST

रविवारी पेमा खांडू यांनी काँग्रेस सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर चोवना मेइन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

इटानगर : अरुणाचलमधील वेगवान राजकीय घडामोडीत रविवारी पेमा खांडू यांनी काँग्रेस सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर चोवना मेइन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ३७ वर्षीय पुत्र पेमा खांडू हे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आहेत. पूर्वोत्तरच्या या राज्याचे ते नववे मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांना राज्यपाल तथागत राय यांनी राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दोरजी खांडू यांचा एका विमान अपघातात २०११ मध्ये मृत्यू झाला होता. शपथविधीनंतर येथे पत्रकारांशी बोलताना पेमा खांडू म्हणाले की, राज्यपाल राज्यात परतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. राय हे त्रिपुराचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार आहे. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेउन सर्व प्रमुख नेत्यांना सोबत घेउन राज्याचा विकास करु, असे ते म्हणाले. अरुणाचलमधील नाट्यमय राजकीय घडामोडीत शनिवारी काँगे्रसने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पेमा खांडू यांची नेतेपदी निवड केली. (वृत्तसंस्था)>तरुणपणीच राजकारणातपेमा खांडू (३७) हे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर ते तरुणपणीच राजकारणात सक्रीय झाले. तवांग येथील रहिवाशी असलेल्या पेमा यांनी वडीलांच्या मृत्यूनंतर २०११ मध्ये प्रथम अरुणाचल विधानसभेत प्रवेश केला. आमदार म्हणून ते बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर कॅबिनेटमध्येही त्यांची वर्णी लागली होती. तुकी यांच्या सरकारमध्ये ते शहरी विकास मंत्री होते.