शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या!

By admin | Updated: March 10, 2016 02:45 IST

देशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीदेशाच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यासोबतच त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.मंगळवारी राज्यसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह देशभरातील सर्व दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. त्यांना रबीच्या हंगामापूर्वी नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. जेणेकरून ते खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतरही शेती करू शकले असते; परंतु काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही, ही अत्यंत दु:खदायी बाब आहे.लक्षवेधीद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वास्तव मांडताना दर्डा यांनी सांगितले की, देशाचा कणा बळकट केला नाही, तर प्रगती खुंटेल आणि ज्या प्रगतीचे स्वप्न आम्ही बघत आहोत त्याची पूर्तता करणे कठीणच नव्हे, तर अशक्य होईल. तेव्हा सरकारने शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी करावे.ते म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३८,००० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु आतापर्यंत आठ राज्यांसाठी फक्त ९,४८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हा चिंतेचा विषय आहे. हा विषय येथेच थांबत नाही. २७ जानेवारी २०१५ पर्यंत सरकारकडून निव्वळ २,३८६ कोटी रुपयेच जारी करण्यात आले आहेत; पण वस्तुस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांवर अंदाजे सहा खर्व रुपयांचे कर्ज आहे आणि त्यापैकी केवळ ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची स्थिती अधिकाधिक दयनीय होत चालली आहे. दुसरीकडे मोठमोठी औद्योगिक घराणी आणि उद्योगपतींच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची सहजपणे फेररचना केली जाते ही सर्वात मोठी विडंबना आहे.